ETV Bharat / bharat

#DelhiElections2020Live : 'आप' सलग तिसऱ्यांदा बनवणार सरकार; पराभव स्वीकारत भाजपनेही केले केजरीवालांचे अभिनंदन..

author img

By

Published : Feb 11, 2020, 7:48 AM IST

Updated : Feb 11, 2020, 4:56 PM IST

दिल्ली विधानसभा
Live Updates Delhi Vidhan Sabha Election 2020 Result

16:50 February 11

भाजपने स्वीकारला पराभव, मनोज तिवारी यांनी पत्रकार परिषद घेऊन केले केजरीवालांचे अभिनंदन..

दिल्लीच्या जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे. या पराभवामागच्या कारणांबाबत आम्ही चिंतन करू. जनतेने आम्हाला जो कौल दिला आहे, त्याचा आम्ही मान राखतो, आणि अरविंद केजरीवालांचे अभिनंदन करतो, असे मत दिल्ली भाजपचे प्रदेश अध्यक्ष मनोज तिवारी यांनी व्यक्त केले. मागील निवडणुकीपेक्षा आठ टक्के मतदान आम्हाला जास्त मिळाले आहे, म्हणजेच जनतेने आम्हाला पूर्णपणे नाकारले नाही. जिथे आम्ही कमी पडलो, त्याबाबत आम्ही नक्कीच चिंतन करू, असेही ते म्हणाले.

निकालानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये तिवारी बोलत होते.

15:38 February 11

हा माझा नाही, तर दिल्लीकरांचा विजय - अरविंद केजरीवाल..

दिल्ली विधानसभा निवडणुकांचा निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे. केजरीवाल सरकारने सलग तिसऱ्यांदा दिल्लीमध्ये सरकार स्थापन केले आहे. यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत जनतेचे आभार मानले आहेत. हा विजय माझा नाही, तर हा दिल्लीच्या जनतेचा विजय आहे. दिल्लीकरांनी हे दाखवून दिले आहे, की आता त्यालाच मत मिळणार जो शाळा-रूग्णालये बनवेल. ही एका नव्या पद्धतीच्या राजकारणाची सुरूवात आहे.

15:12 February 11

52 जागांवर आपचा विजय

आम आदमी पक्षाने 52 जागांवर विजय प्राप्त केला असून भाजपने 6 जागांवर विजय मिळवला आहे. 

15:00 February 11

आपचा 47 जागांवर विजय

आपने 47 जागांवर विजय मिळवत भाजपला जोरदार धक्का दिला आहे, तर भाजपने 6 जागांवर विजय प्राप्त केला असून 1 जागेवर आघाडी घेतली आहे. 

14:58 February 11

आतिशी मार्लेना आणि अमानतुल्ला खान यांचा विजय

  • आपच्या नेत्या आतिशी मार्लेना यांनी कालाकाजी मतदारसंघातून विजय मिळवत  भाजप नेत्या शिवानी चोप्रा यांचा पराभव केला आहे.  
  • मुख्यमंत्री केजरीवाल यांचे आप नेता कपिल मिश्रा  यांनी अभिनंदन केले.  
  • शाहीन बागमध्ये सीएए आणि एनआरसीविरोधात आंदोलन सुरू आहे. त्यामुळे येथील ओखला मतदारसंघाने देखील सर्वांचे लक्ष वेधले होते. येथे आम आदमी पक्षाचे उमेदवार अमानतुल्ला खान यांनी तर भाजपचे उमेदवार ब्रह्म सिंह यांचा पराभव केला आहे.  

14:45 February 11

मनिष सिसोदिया यांनी पटपडगंज मतदारसंघातून विजय प्राप्त केला

सुरवातीला पिछाडीवर पडलेले आम आदमी पक्षाचे स्टार प्रचारक आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी  पटपडगंज मतदारसंघातून  विजय प्राप्त केला. 

14:26 February 11

आपने गाठला 'मॅजिक नंबर',सलग तिसऱ्यांदा बनवणार दिल्लीत सरकार,

भाजपला धक्का देत आपने दिल्ली निवडणुकीमध्ये तब्बल 41 जागांवर विजय मिळवत मॅजिक नंबर गाठला आहे. सलग तिसऱ्यांदा भाजप दिल्लीमध्ये सरकार बनवणार आहे. अनेक नेत्यांनी अरविंद केजरीवालांचे अभिनंदन केले आहे. 

14:03 February 11

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया 1800 मतांनी आघाडीवर

दिल्ली विधानसभेच्या २६ मतदारसंघांचे चित्र स्पष्ट झाले आहे. यांपैकी २४ जागांवर आप, तर २ जागांवर भाजपने बाजी मारली आहे. बाकी ४४ मतदारसंघांपैकी ३५ जागांवर आप, तर ९ जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया ७७९ मतांनी आघाडीवर आहेत.

13:52 February 11

#DelhiElections2020Live : 'आप'ने २० जागा जिंकल्यानंतर, अखेर भाजपचा एका जागेवर विजय..

आपने २० जागांवर विजय मिळवल्यानंतर, अखेर भाजपने आपला पहिला विजय मिळवला आहे. विश्वास नगर मतदारसंघातून भाजपचे ओम प्रकाश शर्मा विजयी झाले आहेत. बाकी ४९ जागांपैकी ३९ जागांवर आप, तर १० जागांवर भाजप आघाडीवर आहे. 

13:27 February 11

आम आदमी पार्टी आणि भाजपामध्ये लढत होत असताना काँग्रेस मात्र शून्यावरच आहे. आपने २० जागांवर विजय प्राप्त केला आहे. तर बाकी 50 पैकी आप पक्षाने 38 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपही 12 जागांवर आघाडीवर आहे.

12:53 February 11

आपने 5 जागांवर विजय प्राप्त केला असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अरविंद केजरीवालांचे अभिनंदन केले आहे.

12:39 February 11

  • आम आदमी पार्टी आणि भाजपामध्ये लढत होत असताना काँग्रेस मात्र शून्यावरच आहे. 'आप'ने ५ तर भाजपने 1 जागा जिंकली आहे. बाकी ६४ मतदारसंघांपैकी आप ५२ तर भाजप १२ जागांवर पुढे आहे.
  • सिलमपूर येथून अब्दुल रहेमान यांनी विजय मिळवला आहे. आम आदमी पक्षाने या ठिकाणी 2015 मध्ये विजय मिळवणारे मोहम्मद इशाक यांच्याऐवजी अब्दुल रहमान यांना मैदानात उतरवले होते. तर भाजपने कौशल मिश्रा आणि काँग्रेसने मतीन अहमद यांना उमेदवारी दिली होती.
  • संगम-विहारमधून आपचे नेते दिनेश मोहनिया  यांनी विजय प्राप्त केला आहे. येथे भाजपकडून डॉ. एससीएल गुप्ता आणि काँग्रेसचे  पूनम आजाद रिंगणात होत्या.  तर देवली मतदारसंघातून  आपचे नेते प्रकाश जारवाल यांनी विजय प्राप्त केला आहे. भाजपच्या अरविंद कुमार  यांचा त्यांनी पराभव केला.
  • भाजपने 1 जागा जिंकत आपले खाते उघडले आहे.

11:36 February 11

आम आदमी पक्षाने 54 जागांवर आघाडी मिळवली असून भारतीय जनता पक्ष 16 जागांवर आघाडीवर आहे. पटपडगंज येथून उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तिसऱ्या फेरीनंतर 1427 मतांनी मागे पडले आहेत.  

  • ओखला येथून भाजपचे नेते ब्रह्म सिंह आघाडीवर आहेत.
  • शाहदरा येथून आपचे नेते राम निवास गोयल पिछाडीवर पडले आहेत.
  • त्रिलोक पुरी मतदारसंघामध्ये आप नेता रोहित कुमार आघाडीवर आहेत.

10:02 February 11

निवडणूक आयोगाच्या ताज्या माहितीनुसार आम आदमी पक्ष 47 जागांवर तर भारतीय जनता पक्ष 19 जागांवर आघाडीवर आहे.

िे्ि
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार...

दिल्लीच्या ओखला मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आघाडीवर आले असून त्यांनी आपचे नेते अमानतुल्ला खान यांना मागे टाकले आहे.  तसेच बल्लीमारन मतदारसंघातूनही भाजप आघाडीवर आहे. दोन्ही मतदारसंघामध्ये मुस्लिम मतदारांची संख्या खूप जास्त आहे. आप 52 जागांवर आघाडीवर असून भाजप 17 जागांवर आघाडीवर आहे. तर इतर पक्ष एका जागेवर आघाडीवर आहे.  

09:44 February 11

आप 54 तर भाजप 15 जागांवर आघाडीवर

आप मागे पडत  दुसऱ्सा फेरीत  54 वरून 51  आली आहे. भाजप 14 वरून 18 जागांवर आघाडीवर गेली आहे. 

09:43 February 11

आपचे नेते आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.

  • मॉडेल टाऊन मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कपिल मिश्रा पिछाडीवर पडले आहेत.
  • बुरांडी मतदारसंघातून आपचे नेते संजीव झा आघाडीवर आहेत.
  • शाहीन बागमधील ओखला मतदारसंघामधून आम आदमी पक्षाचे उमेदवार अमानतुल्ला खान आघाडीवर आहेत. गेल्या वर्षी त्यांनी याच मतदारसंघातून विजय मिळवला होता.
  • आपचे नेते दिलीप कुमार पांडे आघाडीवर आहेत.
  • मंगोलपुरी मतदरासंघातून राखी बिडला आघाडीवर आहेत.

09:32 February 11

नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीची मतमोजणी पार पडली आहे. 

09:32 February 11

दिल्लीच्या राजेंद्र नगर विधानसभा मतदार संघातून आम आदमी पक्षाचे उमेदवार राघव चड्डा हे गोल बाजाराच्या मतमोजणी केंद्रात उपस्थित आहेत.

09:32 February 11

आप'ला बहुमत मिळत असल्याचे पाहून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

आप'ला बहुमत मिळत असल्याचे पाहून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.  पक्ष कार्यालयात कार्यकर्ते पोहचले आहे. तर पक्षाचे दिल्ली प्रभारी संजय सिंह देखील कार्यालयात पोहोचले आहेत

09:20 February 11

महेश माहेश्वरी,आप प्रदेश प्रवक्ता,

आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये जोरदार लढत होत असून काँग्रेसनेही आपले खाते उघडले आहे.  आप 55 जागांवर  आघाडी घेतली आहे. तर 13 जागांवर  आघाडी घेतली आहे.

09:19 February 11

गोपाल राय, आपचे उमेदवार

आपच्या नेत्या आतिशी मार्लेना यांनी कालाकाजी मतदारसंघातून आघाडीवर आहेत. त्यांनी भाजप नेत्या शिवानी चोप्रा यांना पिछाडीवर टाकले आहे. 

09:13 February 11

सुशील गुप्ता, आपचे खासदार

आपने 52 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप फक्त 14 जागांवर आघाडीवर आहे. 

09:08 February 11

बाबरपूर येथून गोपाल राय आघाडीवर आहे. 

09:03 February 11

आप 48 जागांवर आघाडीवर असून भाजपने फक्त 14 जागांवर आघाडीवर आहे. 

08:27 February 11

आपने  22 जागांवर  तर भाजप 8 जागांवर आघाडीवर आहे. 

08:03 February 11

मनिष सिसोदीया...

आम्ही गेल्या 5 वर्षांपासून दिल्लीकरांसाठी काम केले आहे. त्यामुळे आम्हीच सत्तेमध्ये येणार असा मला विश्वास आहे, असे आपचे नेते मनिष सिसोदिया म्हणाले. 

07:42 February 11

#DelhiElections2020Live : 'आप' सलग तिसऱ्यांदा बनवणार सरकार; पराभव स्वीकारत भाजपनेही केले केजरीवालांचे अभिनंदन..

नवी दिल्ली -   राजधानी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार असून 8 वाजता मतमोजणीला सुरवात झाली आहे.  विधानसभेच्या ७० जागांसाठी ८ फेब्रुवारीला मतदान झाले होते. निवडणुकीत ५९३ पुरुष उमेदवार आणि ७९ महिला उमेदवारांनी सहभाग घेतला होता. मतदानानंतर सर्व मतदानोत्तर चाचण्यांनी (एक्सिट्स पोल) आम आदमी पक्षाला बहुमत येईल, असे चित्र दाखविले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत यावर्षी एकूण 62.59 टक्के लोकांनी मतदान केले. 2015 मध्ये विधानसभा निवडणुकीत 67.47 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा ५ टक्के कमी मतदान झाले आहे.  

Intro:Body:

नवी दिल्ली -   राजधानी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार असून 8 वाजता मतमोजणीला सुरवात होईल.. विधानसभेच्या ७० जागांसाठी ८ फेब्रुवारीला मतदान झाले होते. निवडणुकीत ५९३ पुरुष उमेदवार आणि ७९ महिला उमेदवारांनी सहभाग घेतला होता. मतदानानंतर सर्व मतदानोत्तर चाचण्यांनी (एक्सिट्स पोल) आम आदमी पक्षाला बहुमत येईल, असे चित्र दाखविले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत यावर्षी एकूण 62.59 टक्के लोकांनी मतदान केले. 2015 मध्ये विधानसभा निवडणुकीत 67.47 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा ५ टक्के कमी मतदान झाले आहे.  मतगणनेसाठी 33 पर्यवेक्षक असून  ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम्सवर सुरक्षारक्षकांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.


Conclusion:
Last Updated : Feb 11, 2020, 4:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.