महाराष्ट्र

maharashtra

Sandeep Raut : ...म्हणून त्रास दिला जातोय, संदीप राऊतांची साडेचार तास चौकशी

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 6, 2023, 10:43 PM IST

EOW Interrogated Sandeep Raut: मुंबई महानगरपालिकेच्या कोविड काळातील कथित खिचडी घोटाळ्या प्रकरणी आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे धाकटे भाऊ संदीप राऊत यांची तब्बल साडेचार तास चौकशी करण्यात आली. ते आज सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात दाखल झाले होते. त्यानंतर आज दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास राऊत आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयातून निघाले. त्यावेळी राऊत यांनी मी कोणता घोटाळा केला नाही. संजय राऊतांचा भाऊ असल्याने आपल्याला त्रास दिला जातोय, असे माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

EOW Interrogated Sandeep Raut
संदीप राऊतांची साडेचार तास 'ईओडब्ल्यू'ने केली चौकशी

मुंबईEOW Interrogated Sandeep Raut: संजय राऊत यांचे धाकटे बंधू संदीप राऊत यांची खिचडी घोटाळ्या प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तालयातील EOW कार्यालयात चौकशी करण्यात आली होती. संदीप राऊत उर्फ आप्पा यांनी मी कोणता घोटाळा केला नाही, असा दावा केला आहे. तसेच त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, माझ्या बँक खात्याचं स्टेटमेंट EOW ने मागितलं असून माझ्या बँक खात्यात 5 ते 6 लाख रक्कम आलेली दिसतेय. मात्र, त्याबाबत मी समाधानकारक खुलासा केला आहे. संजय राऊत यांचा भाऊ म्हणून मला त्रास दिला जात आहे. खरे भ्रष्टाचारी मोकाट आहेत. मला पुन्हा बोलावलं तर मी पुन्हा येईन असे राऊत म्हणाले.

मुंबई महापालिकेच्या खिचडी घोटाळ्यात माझा सहभाग नाही. माझ्या बँक खात्याचं स्टेटमेंट EOW ने मागितलं असून माझ्या बँक खात्यात 5 ते 6 लाख रक्कम आलेली दिसतेय. मात्र, त्याबाबत मी समाधानकारक खुलासा केला आहे. संजय राऊत यांचा भाऊ म्हणून मला त्रास दिला जात आहे.-- संदीप राऊत, संजय राऊतांचा धाकटा भाऊ


समन्स पाठवून संदीप राऊतांना चौकशासाठी बोलावले:खिचडी घोटाळा प्रकरणी खासदार संजय राऊत यांचा भाऊ संदीप राऊत यांना काल आर्थिक गुन्हे शाखेने समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावले होते. आर्थिक गुन्हे शाखेने संदीप राऊत यांना समन्स बजावून आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. खिचडी घोटाळा प्रकरणात संदीप राऊत यांनाही पैसे मिळाले होते, हे तपासात उघड झाल्याने त्यांचीही चौकशी करण्यात आली आहे. खिचडी घोटाळा प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांचीही चौकशी करण्यात आली आहे.

खिचडी बनवण्याचं 52 कंपन्यांना कंत्राट: कामगारांना जेवण देण्यासाठी भारत सरकारचंही समर्थन होतं. या स्थलांतरित कामगारांसाठी खिचडी बनवण्याचं कंत्राट 52 कंपन्यांना मुंबई महानगरपालिकेनं दिलं होतं. सुरुवातीच्या 4 महिन्यात 4 कोटी खिचडी पॅकेट वाटण्यात आले, असा मुंबई महानगरपालिकेनं दावा केला आहे. मात्र, यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला असून त्याचीच चौकशी सुरू आहे. आर्थिक गुन्हे शाखेने कथित खिचडी घोटाळ्यात संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर, सुनिल बाळा कदम, राजीव साळुंखे यांच्यासह काही महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. ठाकरे गटातील नेत्यांना त्रास देण्यासाठी भाजपा सरकारी यंत्रणेचा वापर केला जात असल्याचा आरोप ठाकरे गटातील नेत्यांनी केला आहे. संजय राऊतांमागे लावण्यात आलेला ईडीचा ससेमिरा हा त्याचाच भाग असल्याचा आरोप करण्यात आला होता.

हेही वाचा:

  1. Goregaon Fire Incident : मुख्यमंत्री शिंदेंनी रुग्णालयात जखमींची घेतली भेट; चौकशीचे दिले आदेश
  2. NCP Hearing : अजित पवार गटाकडून खोटी कागदपत्रं सादर, शरद पवार गटाच्या वकिलाचा मोठा दावा
  3. Sunil Tatkare On Jayant Patil : जयंत पाटीलच 'पवारांचा' करेक्ट कार्यक्रम करतील - सुनील तटकरेंचा मोठा दावा

ABOUT THE AUTHOR

...view details