ETV Bharat / state

Goregaon Fire Incident : मुख्यमंत्री शिंदेंनी रुग्णालयात जखमींची घेतली भेट; चौकशीचे दिले आदेश

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 6, 2023, 7:55 PM IST

Updated : Oct 6, 2023, 8:15 PM IST

Goregaon Fire Incident : मुंबईतील गोरेगाव परिसरातील इमारतीला शुक्रवारी पहाटे भीषण आग लागली होती. यात आठ जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. या सर्व जखमींची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी रात्री रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

Etv Bharat
Etv Bharat

मुंबई : Goregaon Fire Incident : गोरेगाव येथील आगीची घटना दुःखद आहे. मी सकाळपासून पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांच्या संपर्कात होतो. रुग्णालयातील जखमी रुग्णांची भेट घेतली आहे. सर्व रुग्ण धोक्याबाहेर असून, त्यांच्यावर योग्य उपचार केले जात आहेत. या घटनेची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM on Goregaon Fire Incident) यांनी दिली आहे.

गोरेगावाता अग्नितांडव : मुंबईतील गोरेगाव पश्चिम परिसरातील 'जय भवानी' इमारतीच्या पार्किंगमध्ये शुक्रवारी (6 ऑक्टोबर) पहाटे 3 च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत आतापर्यंत 8 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. या आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या सात ते आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीला आटोक्यात आणण्यात युद्धपातळीवर काम करण्यात आलंय. या घटनेत जवळपास 30 गाड्या जळून खाक झाल्या आहेत. दरम्यान, ही आग कशामुळं लागली याचा तपास अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांकडून व स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केलंय. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

  • ०६-१०-२०२३ 📍मुंबई गोरेगाव येथील इमारतीला लागलेल्या आगीत जखमी झालेल्या नागरिकांची चौकशी https://t.co/itwpxyjAhd

    — Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 6, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुख्यमंत्र्यांनी जखमींची घेतली भेट : या आगीत मृत झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत तसेच जखमींना शासकीय खर्चानं उपचार करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या आगीत आतापर्यंत आठ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. तर सुमारे 31 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये बारा पुरुष, 16 महिला आणि दोन छोट्या बालकांचा समावेश आहे. या सर्व जखमींची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

मुख्यमंत्र्यांकडून संवेदना : 'जय भवानी' इमारतीला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या आठ व्यक्तींच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची तातडीची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली. तर ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींना शासकीय खर्चाने उपचार देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या दुर्घटनेत काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात काही लहान मुलांचाही समावेश आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेबाबत मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडून आपण वेळोवेळी माहिती घेत आहोत.

हेही वाचा -

  1. Mumbai Fire News : मुंबईत अग्नितांडव! 8 जणांचा होरपळून मृत्यू; 51 जखमी, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली पाच लाखाची मदत
  2. Fire In J P Nadda Program: भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आरती करत कळसाला लागली आग; पाहा व्हिडिओ
  3. Fire Broke Out In Mumbai: साकीनाका परिसरातील इमारतीला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
Last Updated : Oct 6, 2023, 8:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.