महाराष्ट्र

maharashtra

जलसंकट.. अमरावतीच्या अप्पर वर्धा धरणात केवळ 13 टक्के जलसाठा

By

Published : Jun 16, 2019, 4:51 PM IST

अप्पर वर्धा धरणातील पाणी पातळीत झपाट्याने घट झाली आहे. पाण्याअभावी वर्धा नदी पात्र जवळपास कोरडे पडले आहे. यावर्षी पाऊस झाला नाही तर नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

अप्पर वर्धा धरण

अमरावती - मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा धरण हे विदर्भातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळखले जाते. सध्या अप्पर वर्धा धरणातील पाणी पातळीत झपाट्याने घट होत आहे. अप्पर वर्धा धरणाच्या जलाशयावर अमरावती शहर, मोर्शी ,वरुड व वर्धा जिल्ह्यातील आष्टीसह लहान मोठ्या गावांची तहान भागविली जाते. सध्या धरणात केवळ 13 टक्के इतकाच उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे.

अप्पर धरणातील पाणीसाठ्यासंदर्भात माहीती देतांना अधिकारी

पाण्याअभावी वर्धा नदी पात्र जवळपास कोरडे पडले आहे. यावर्षी पाऊस झाला नाही तर नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. अप्पर वर्धा धरणातून अमरावती आणि मोर्शी शहरातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी सोडल्या जाते . तर याच परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याचा पुरवठा केला जातो. मागील दोन वर्षातील कमी पर्जन्यमान यामुळे धरण पुरेसे भरले नाही. त्यामुळे यंदा धरणाने सर्वाधिक तळ गाठला आहे.

2008 नंतर कधीही या धरणाने तळ गाठला नव्हता. पण 2019 मध्ये ही परिस्थिती ओढवली आहे. विहिरी व बोअरवेल सुध्या कोरडेठाक पडले आहे. यावर्षी मृग जोरात न बरसल्यास भर पावसाळ्यातही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.

Intro:अमरावतीच्या अप्पर वर्धा धरणात केवळ 13 टक्के जलसाठा.

2008 नंतर प्रथम ही परिस्थिती
-----------------------------------------------
अमरावती अँकर

विदर्भातील सर्वात मोठ्या असलेल्या अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा धरणातील पाणी पातळीत सध्या झपाट्याने घट होत आहे. अप्पर वर्धा धरणाच्या जलाशयावर अमरावती शहर, मोर्शी ,वरुड,वर्धा जिल्ह्यातील आष्टी सह लहान मोठ्या गावाची तहान भागवणाऱ्या धरणाची परिस्थिती यावर्षी बिकट झाली आहे. सध्या यात उपयुक्त जलसाठा केवळ 13 टक्के इतकाच जलसाठा शिल्लक असल्याने यावर्षि पाऊस झाला नाही तर नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.पाण्याअभावी वर्धा नदी पात्र जवळपास कोरडे पडले आहे.

अमरावती व वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर जिल्ह्यातील सर्वात मोठे असे अप्पर वर्धा धरण आहे. गेल्या कित्येक वर्षापासून या धरणातून अमरावती, मोर्शी शहरातील नागरिकांना पिण्यासाठी तर त्याच परिसरातील शेतकऱ्यांनाही सिंचनासाठी पाण्याचा पुरवठा केला जातो. पण मागील दोन वर्षातील कमी पर्जन्यमान यामुळे धरणही पाहिजे तसे भरले नाही . यंदा धरणाने सर्वाधिक तळ गाठला आहे 2008 नंतर आता तब्बल 2019 मध्ये ही परिस्थिती ओढवली आहे. परिसरातील अनेक विहिरी व बोअरवेलचे सध्या कोरडेठाक पडले नागरिकांना भीषण संकटाला सामोरे जावे लागते. या वर्षी मृग जोरात नंबर असल्यास आणि पाऊस न झाल्यास भर पावसाळ्यातही नागरिकांना द्यावे लागेल असे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहेBody:अमरावतीConclusion:अमरावती

ABOUT THE AUTHOR

...view details