महाराष्ट्र

maharashtra

Chandrashekhar Bawankule : स्टंटबाजी करू नका, आता शिंदे-फडणवीसांचे सरकार; चंद्रशेखर बावनकुळेंचा सज्जड दम

By

Published : Jul 28, 2022, 4:34 PM IST

Updated : Jul 28, 2022, 5:17 PM IST

Chandrasekhar Bawankule
चंद्रशेखर बावनकुळे

सोनीया गांधीच्या ( Sonia Gandhi ) ईडी चौकशी वरुन राज्यात काँग्रेसकडून सुरु असलेल्या आंदोलनावर चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrasekhar Bawankule ) यांनी जोरदार टिका केली आहे. काँग्रेसची स्टंटबाजी तपास यंत्रणांवर दबाब आण्यासाठी असल्याचा आरोप नेत्यांनी केला आहे. आता महाविकास आघाडीचे सरकार ( Maha Vikas Aghadi Govt ) नाही, शिंदे फडणवीसांच सरकार तुमची स्टंटबाजी चालू दिली जाणार नाही असे त्यांनी काँग्रेसला सुनावले आहे.

शिर्डी - ईडी चौकशीला एव्हढ घाबरता कशाला, तुम्ही काही केल नसेल तर सुखरुप बाहेर पडाल. मात्र, स्टंटबाजी करु नका, आता मविआचे सरकार नाही. असे भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrasekhar Bawankule ) यांनी म्हटले आहे. आता शिंदे फडणवीसांच सरकार ( Shinde Fadnavis Govt ) आहे. तुमची स्टंटबाजी उधळून लावली जाईल. असा सज्जड दमही त्यांनी काँग्रेस कार्यकत्यांना दिला. बावनकुळे आज शिर्डीत साईबाबांच्या दर्शनसाठी आले होते, तेव्हा त्यांनी काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला.

चंद्रशेखर बावनकुळे

काँग्रेसच्या आंदोलनावर जोरदार टिका - सोनीया गांधीच्या ( Sonia Gandhi ) ईडी चौकशी वरुन राज्यात काँग्रेसकडून सुरु असलेल्या आंदोलनावर बावनकुळे यांनी जोरदार टिका केली आहे. काँग्रेसची स्टंटबाजी तपास यंत्रणांवर दबाब आण्यासाठी असल्याचा आरोप नेत्यांनी केला आहे. आता महाविकास आघाडीचे सरकार नाही, शिंदे फडणवीसांच सरकार तुमची स्टंटबाजी चालू दिली जाणार नाही असे त्यांनी काँग्रेसला सुनावले आहे. गांधी परीवाराला ईडीने चौकशीसाठी बोलविल्यानंतर कॉग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळन लागले असुन नागपुरात एक गाडीही पेटविण्यात आली आहे. या विषय बोलतांना बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांनी एक भंगारातील गाडी आणुन पेटवली आहे. जाळपोळ करण्याची काँग्रेसची हिंमत नाही. राज्यात फडणवीस शिंदेच सरकार आहे. हे सरकार महाविकास आघाडीच नाही. त्यामुळे आता स्टंटबाजी करु नका असा टोला त्यांनी काग्रेसला लगावला. विरोधी पक्ष म्हणुन तुम्हाला जी जबाबदारी मिळाली आहे त्या दृष्टीने तुम्ही काम करा. जी स्टंटबाजी तुम्ही चालवली आहे. ती सरकार उधळवून लावेल असा ईशाराही बावनकुळे यांनी विरोधी पक्षांना दिला.

काँग्रेलला भाती कशाची? - हेराल्ड प्रकरणावरुन ( National Herald case ) सोनिया गांधीना ईडीने चौकशीसाठी बोलविले ( Sonia Gandhi questioned by ED ) आहे. ती मागणी भारतीय जनता पक्षाने केलेली नव्हती. कोर्टाच्या आदेशानंतर त्यांची चौकशी होते आहे. नोटीसा आल्यानंतर त्या पुढे जावून शासकीय विभागाने आपले म्हणने मांडायचे असते. आपण जर, काही काळबैर केल नसेल तर तुम्हाला भिती कशाची? त्यामुळे ईडीच्या नोटीसा आल्यानंतर जे आंदोलन केली जातात ती तपास यंत्रणांवर दबाव आणन्यासाठी केली जात आहेत. न्यायालयाने सांगीतल्या नुसार चौकशी होतेय. मात्र, यांचे कार्यकर्ते केवळ तपास यंत्रणांवर दबावासाठी आंदलोन करता आहेत असा आरोप बाववकुळे यांनी केला.

हेही वाचा -Uddhav Thackeray : हृदयस्पर्शी! स्वतःच्या रक्ताने काढले उद्धव ठाकरे यांचे पोर्ट्रेट; कार्यकर्त्याने दिल्या अनोख्या शुभेच्छा

संजय राऊतांवर टाळ्या वाजविण्याची वेळ -संजय राऊतांबद्दल बोलतांना ते म्हणाले की, संजय राऊत सध्या रात्रभर झोपत नाही. त्यामुळे ते काहीही बडबडतात. ज्याचा काहीच संबध नसतो असे वक्तव्य सध्या राऊत करता आहेत. त्यांना मेडीटेशनची गरज आहे. राज्यात शिवसेना, भाजपचे सरकार आले आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत. एकनाथ शिंदेंनी बहुमत सिध्द केल आहे. महाराष्ट्रातील 75 टक्याच्यावर जिल्हा अध्यक्ष हे एकनाथ शिंदेंच्या बरोबर आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदें गटाला भारतीय जनता पक्षात विलीनीकरण करण्याची गरज नाही. संजय राऊतांना आता एकनाथ शिंदेकडे असलेल बहुमत देखवत नसल्याने ते अस्वस्थ झाले. पक्षनेते पद हे शिदेंनकडे जाईल त्यामुळे आपल्यावर फक्त टाळ्या वाजविण्याची, पेटी वाजत बसून गाण म्हणण्याची वेळ येईल असे संजय राऊतांना वाटते. ते स्वप्नात काय पाहतील, काय बोलतील याचा भरवसाट नसल्याने संजय राऊतांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे बावनकुळे यांनी गुरुवारी शिर्डीत साईबाबांच्या दर्शनानंतर माध्यमांशी बोलतांना म्हटल आहे.

साईचरणी प्रार्थना -समाधीचे दर्शन घेतल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचे पुरामुळे नुकसान झाले आहे. त्यातून त्यांना सावरण्यासाठी सरकार मदत करेलच मात्र, शेतकर्यांनी आत्महत्या सारखे पाऊल उचलू नये. पुर परीस्थीतीनंतर शेतकर्यांचे भल व्हाव ही साईचरणी प्रार्थना केल्याचे बावनकुळे यांनी म्हटल आहे. मला पक्षाने आता पर्यंत भरभरुन दिले आहे. पुढे बोलतांना बावनकुळे म्हणाले, मंत्री मंडळात घेतलच पाहीजे, मंत्री मंडळात स्थान मिळालच पाहीजे अस कुठल्याही नेत्याला कार्यकर्त्याला वाटु नये. जी जबाबदारी मिळेल ती चांगल्या पध्दतीने पार पाडली पाहीजे पक्षात काम करतांना विना अपेक्षानेच काम केल पाहीजे असा सल्ला त्यांनी कार्यकर्तांना दिला आहे.

हेही वाचा -Sanjay Raut : 'त्या' १२ खासदारांना अपात्र ठरवा.. संजय राऊतांची लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे मागणी

Last Updated :Jul 28, 2022, 5:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details