ETV Bharat / state

उज्ज्वल निकम यांच्यावर कोणाचा दबाव होता? ते त्यांनी स्पष्ट करावं; ॲड. आंबेडकर यांचा सवाल - Prakash Ambedkar On Ujjwal Nikam

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 15, 2024, 10:11 PM IST

Prakash Ambedkar On Ujjwal Nikam : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपाचे उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील हेमंत करकरे, विजय साळसकर आणि अशोक कामटे यांचा जीव घेणाऱ्या गोळ्या दहशतवादी कसाबच्या होत्या की, अन्य कुणाच्या? यासंदर्भात उज्ज्वल निकम यांनी खुलासा करावा, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.

Prakash Ambedkar On Ujjwal Nikam
ॲड. आंबेडकर आणि उज्ज्वल निकम (MH DESK)

मुंबई Prakash Ambedkar On Ujjwal Nikam : 26/11 खटल्यातील सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी, कोणत्यातरी धार्मिक संघटनेला वाचवण्यासाठी, तसंच कोणत्यातरी व्यक्तीला वाचवण्यासाठी त्याकाळी आपल्यावर दबाव असेल तर ते स्पष्ट करावं, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांना केलंय. आता आपण लोकसभेचे उमेदवार आहात आता कोणताही दबाव नाही. प्रामाणिकपणे निकम यांनी सांगावं की, त्यांच्यावर कोणी दबाव आणला होता का? की, करकरे, साळसकर, कामटे आणि पाच पोलीस कर्मचारी यांच्या संदर्भातले पुरावे लीक करू नका अशा कोणी सूचना दिल्या होत्या?, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत केलाय.



26/11 मध्ये काय घडलं आहे? : अँड. उज्वल निकम यांनी 26/11 च्या खटल्यात काही दबाव होता का? हे स्पष्ट करावं असं आवाहन करताना ॲड. आंबेडकर म्हणाले की, जसं परकियांकडून देशाच्या एकतेला धोका आहे, तसंच बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेतील शेवटच्या भाषणात म्हटलं आहे की, या देशात जयचंद किती निर्माण झाले आणि या भारताला स्वतंत्र अस्तित्व गमवावं लागलं त्याची उदाहरणे त्यांनी दिली आहेत. मी उज्ज्वल निकम यांना आवाहन करतोय की, 26/11 मध्ये काय घडलं आहे? हे लोकांना प्रामाणिकपणं सांगावं. आपण सांगितलेली व्यक्ती आणि संघटना या देशात जयचंदचे काम करणार का? याबद्दल जनता निर्णय घेईल.


हल्ल्यामागील हल्ला नेमका कोणाचा : 26/11 ला हल्ला झाला. त्या हल्ल्यामागील एक हल्ला आहे. ज्याने कोणी हल्ला केला त्याला माहिती होतं की, पाकिस्तान हल्ला करणार आहे. याचा अर्थ त्याचा पाकिस्तानशी संबंध आहे. तो संबंध भाजपा का उलगडत नाही? असा प्रश्न आंबेडकर यांनी भाजपाला विचारला आहे. तसंच, जनतेनं उज्ज्वल निकम यांना विचारलं पाहिजे की, तुम्ही राष्ट्राशी प्रामाणिक नाही तर आम्ही तुम्हाला का मतदान करावं? असाही सवाल ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.

हेही वाचा -

  1. 26/11 हल्ला प्रकरणी उज्ज्वल निकम यांनी सत्य लपवलं; प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप - Prakash Ambedkar On Ujjwal Nikam
  2. "वडेट्टीवारांचे आरोप खरे, उज्ज्वल निकमांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा", कोणी केली मागणी? - Hemant Karkare assassination
  3. २६/११ संदर्भात विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य निराधार, उज्ज्वल निकम यांचा दावा, 'गोबेल्स प्रचार' असल्याचा केला आरोप - Ujjwal Nikam On Vijay Wadettiwar
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.