ETV Bharat / state

२६/११ संदर्भात विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य निराधार, उज्ज्वल निकम यांचा दावा, 'गोबेल्स प्रचार' असल्याचा केला आरोप - Ujjwal Nikam On Vijay Wadettiwar

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 6, 2024, 6:23 PM IST

Ujjwal Nikam On Vijay Wadettiwar
उज्ज्वल निकम विजय वडेट्टीवार (Maharashtra Desk)

Ujjwal Nikam On Vijay Wadettiwar : देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) प्रचाराची धामधूम सुरू असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त करत ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्यावर गंभीर आरोप केले. तर उज्ज्वल निकम यांनी वडेट्टीवार यांचा आरोप निराधार असल्याचं म्हटलंय.

मुंबई Ujjwal Nikam On Vijay Wadettiwar : हेमंत करकरे (Hemant Karkare) यांना लागलेली गोळी कसाबच्या बंदुकीतील नसून 'आरएसएस' समर्थक पोलीस अधिकाऱ्याच्या बंदुकीतील होती, असा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलाय. मात्र, न्यायालयात याबाबत पुरावे लपण्यात आले होते. ते पुरावे लपवणारे देशद्रोही कोण, तर ते उज्ज्वल निकम आहेत. अशा देशद्रोह्याला भाजपानं तिकीट दिल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं. यावरून उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिलीय.

"गोबेल्सचा प्रचार" करायचा आहे : उज्ज्वल निकम यांनी वडेट्टीवार यांचा दावा "निराधार" असल्याचं सांगून फेटाळून लावला आहे. तसंच निकम यांनी आरोप केला की, हिटलरचे सहकार आणि नाझी पक्षाचे प्रमुख प्रचारक असलेल्या जोसेफ गोबेल्सचा संदर्भ देऊन त्यांना फक्त "गोबेल्सचा प्रचार" करायचा आहे. आम्ही न्यायालयीन पुरावे सादर केले आहेत. तुम्हाला फक्त गोबेल्सचा प्रचार करायचा आहे. यामुळं माझी बदनामी होत नाही तर तुमची बदनामी होते, असं निकम म्हणाले.

पाकिस्तानने कधीच वाद घातला नाही : पुढे निकम म्हणाले की, विजय वडेट्टीवार यांनी माझ्यावर केलेल्या आरोपांची मला पर्वा नाही. पण कसाब आणि त्याचा सहकारी अबू इस्माईलने हेमंत करकरे यांची हत्या केली, या गोष्टीवर पाकिस्तानने कधीच वाद घातला नाही. पण विरोधी पक्षनेते या संपूर्ण प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. हल्ल्यात 166 लोक मरण पावले, पण सर्व हुतात्मे झाले याचं मला दु:ख आहे. ज्यांना संपूर्ण गोष्ट माहीत नाही, ते एका पुस्तकावर विश्वास ठेवतात आणि तुम्ही हेमंत करकरे यांचा अपमान करत आहात.

न्यायिक निष्कर्ष काय आहे : कसाबने कबूल केलं की, तो आणि त्याचा मित्र कामा हॉस्पिटलच्या बाहेर पोहोचले असताना त्यांना एक पोलीस जीप दिसली होती. त्या दोघांनी गोळीबार केला. ज्यामध्ये तीन पोलीस अधिकारी ठार झाले. त्यांनी त्यांचे मृतदेह वाहनाच्या मागे ठेवला आणि ते निघून गेले. जीपची तपासणी केली असता, ते पोलीस कर्मचारी नव्हते. तर माझ्या उमेदवारीनंतर तुम्ही हे विधान करत आहात असंही निकम म्हणाले.

पुस्तकात जे लिहिलं आहे तेच सांगितलं : या टीकेमुळं मोठ्या प्रमाणात संताप निर्माण झाल्यानंतर, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण जारी केलं. ते म्हणाले की, ते माझे शब्द नाहीत, मी फक्त एस.एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकात जे लिहिलं आहे तेच सांगितलंय. हेमंत करकरे यांना ज्या बंदुकीने गोळ्या झाडल्या त्या गोळीची प्रत्येक माहिती होती, ती दहशतवाद्यांची गोळी नव्हती. तर मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलिसांबद्दल काँग्रेस नेते अपमानास्पद वक्तव्य करत आहेत. हेमंत करकरे 2008 च्या मुंबई हल्ल्यात ते मारले गेले होते. 2009 मध्ये त्यांना मरणोत्तर अशोक चक्र देण्यात आलं.

हेही वाचा -

  1. 'ईटीव्ही भारत'च्या उलटतपासणीला उज्वल निकम यांनी दिली मनसोक्त उत्तरं; पाहा खास मुलाखत - Ujjwal Nikam Interview
  2. उज्ज्वल निकम यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, भेटीत नेमकं काय घडलं? - Ujjwal Nikam Meet Raj Thackeray
  3. Ujjwal Nikam Reaction: सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालाने सरकारच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम झालेला नाही- उज्ज्वल निकम
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.