ETV Bharat / entertainment

राज्यातील मतदानाचा टक्का घसरला, जॅकी भगनानीनं जनतेला 'हे' केलं आवाहन - Lok Sabha Elections 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 19, 2024, 10:55 AM IST

Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या पाचव्या टप्प्यातील मतदानापूर्वी अभिनेता जॅकी भगनानीनं एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यानं लोकांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

Lok Sabha Elections 2024
लोकसभा निवडणूक 2024 (जैकी भगनानी (@jackkybhagnani Instagram))

मुंबई - Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीत राज्यातील मतदानांचा टक्का घसरला आहे. जनतेनं घराबाहेर पडून मतदान करावे, यासाठी सेलिब्रिटीकडून पुढाकार घेण्यात येत आहे. बॉलीवुडसह मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी मतदान करण्याचं जनतेला आवाहन केलं.

लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या पाचव्या टप्प्यातील मतदानापूर्वी अभिनेता-निर्माता जॅकी भगनानीनं देशातील जनतेला मतदानाचं आवाहन केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मतदारांनी घराबाहेर पडून आपली जबाबदारी पार पाडावी, असं त्यानं एक पोस्टद्वारे सांगितलं आहे. जॅकी भगनानीनं शनिवारी 18 मे रोजी अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यास सांगताना त्यानं म्हटलं, "नमस्कार जसे सर्वांना माहित आहे की, 20 मे रोजी सोमवारी मुंबईमध्ये मतदान होणार आहे. मतदान करणं हे आपलं फक्त कर्तव्य नाही. आपला हक्क आहे, तुम्ही बाहेर जाऊन मतदान करा."

चाहत्यानं केलं जॅकीचं कौतुक : 'लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा 20 मे रोजी होणार आहे. त्यात मुंबईच्या जागांचा समावेश आहे. आता जॅकीच्या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करून जागृत करण्याबद्दल त्याला धन्यवाद म्हणत आहेत. एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं, "जास्तीत जास्त मतदान करा. या सरकारला उचलून फेका." दुसऱ्या एकानं लिहिलं, "तू एकदम बरोबर म्हणत आहे मित्रा." आणखी दुसऱ्या लिहिलं, "यावेळी आम्ही पंजा लावू सर." याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत.

शाहरुख खानचं आवाहन : याआधी शाहरुख खाननेही सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान लोकांना बोटांना शाई लावण्यासाठी प्रोत्साहित केलं होतं. एक्स मीडियावर पोस्ट शेअर करताना शाहरुखनं लिहिलं की, "जबाबदार भारतीय नागरिक म्हणून आपण या सोमवारी महाराष्ट्रात मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. आपण भारतीय म्हणून आपले कर्तव्य करू. आपल्या देशाचे हित लक्षात घेऊन मतदान करू. पुढे जाऊन मतदानाच्या अधिकाराचा प्रसार करा." लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी आठ राज्यांतील 49 जागांवर मतदान होणार आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांसह बिहार, झारखंड, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे.

सेलेब्रिटीकडून मतदानाचं आवाहन- "मुंबईकरांनो, विसरू नका २० मे रोजी मुंबईत मतदान आहे. नक्की मतदान करा," असं आवाहन प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणेनं केलं आहे. अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी घाटकोपरमध्ये मराठी प्रचाराची पत्रकं वाटण्यास विरोध केल्यानं संताप व्यक्त केला होता. "ज्यांनी मराठी माणसाला नॉट वेलकम म्हटलं, त्यांना मतदान करू नका," असं म्हटलं होतं. अभिनेता प्रसाद ओक यांनीही मतदान करण्याचं आवाहन केलं. त्यांनी म्हटलं की, " या दिवशी शासनाने आपणाला मतदान करण्यासाठी सुट्टी दिलेली आहे. दुसरीकडे मतदान हा आपणाला लोकशाहीने दिलेला हक्क आहे. मतदान हे करायलाच हवं."

महाराष्ट्रातील एकूण 13 मतदारसंघ : धुळे, नाशिक, पालघर, भिवंडी, दिंडोरी,कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य मुंबई उत्तर-पूर्व आणि मुंबई दक्षिणमध्ये उद्या मतदान होणार आहे. निवडणुका सात टप्प्यांत होत आहेत. याशिवाय 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.

हेही वाचा :

  1. 'चंदू चॅम्पियन'चे ग्वाल्हेरमध्ये ढोल-ताशांच्या गजरात स्वागत, कार्तिक आर्यनच्या गावात होणार ट्रेलर लॉन्च - Chandu Champion and Kartik Aaryan
  2. "भारतीय म्हणून कर्तव्य पार पाडूया": शाहरुख खानचं बोटांवर शाई लावण्याचं मतदारांना केलं आवाहन - Shah Rukh Khan
  3. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज, पाहा व्हिडिओ - The Great Indian Kapil Show
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.