ETV Bharat / entertainment

"भारतीय म्हणून कर्तव्य पार पाडूया": शाहरुख खानचं बोटांवर शाई लावण्याचं मतदारांना केलं आवाहन - Shah Rukh Khan

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 18, 2024, 5:12 PM IST

Shah Rukh Khan: लोकसभा निवडणुकीच्या 5 व्या टप्प्यापूर्वी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खाननं देशातील जनतेला मतदानासाठी प्रोत्साहित केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे.

Shah Rukh Khan
शाहरुख खान (शाहरुख खान(Instagram)arat)

मुंबई - Shah Rukh Khan : देशभरात लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा 20 मे रोजी होत असून त्यात महाराष्ट्रातही मतदान होणार आहे. दरम्यान, सुपरस्टार शाहरुख खाननं शनिवारी आपल्या सोशल मीडियावर देशातील लोकांना बोटांवर शाई लावण्यासाठी प्रोत्साहित केलं. म्हणजेच लोकशाहीच्या या उत्सवात सर्व देशवासीयांनी पुढे येऊन सहभागी व्हावे, असे आवाहन त्यानं केलं. शाहरुखन आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिलं की, "आपण एक भारतीय म्हणून आपलं कर्तव्य करूया आणि आपल्या देशाचं हित लक्षात घेऊन मतदान करूया. पुढं व्हा आणि मतदानाच्या अधिकाराचा प्रचार करा." शाहरूखची पोस्ट त्याच्या चाहत्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

शाहरुख खान
Shah Rukh Khan (शाहरुख खान (Instagram))

'किंग खान'ची पोस्ट व्हायरल : मतदानाबद्दल प्रतिक्रिया देताना एका चाहत्यांनं 'जवान' मधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जनतेला सांगण्यात येत आहे की निवडणुकीत उभं असलेल्या उमेदवारांना प्रश्न विचारा की, पुढील 5 वर्षांत ते तुमच्यासाठी काय करतील, कुटुंबातील कोणी आजारी पडल्यास त्याच्या उपचारासाठी ते काय करणार आहेत?, नोकरी मिळवून देण्यासाठी ते काय करणार आहेत? या व्हिडिओद्वारे मतदानाविषयी लोकांना जागृत करण्याच काम केलं जात आहे. दरम्यान, या व्हिडिओवर आता अनेक कमेंट्स करत आहेत. काही चाहते आम्ही नक्की मतदान करू, असं म्हणताना कमेंट विभागात दिसत आहेत.

सलमान खाननं केली होती पोस्ट : याआधी शुक्रवारी शाहरुखचा जवळचा मित्र आणि सुपरस्टार सलमान खाननेही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यानं जनतेला सध्या सुरू असलेल्या निवडणुकीत मतदानासाठी जाण्याचं आवाहन केलं होतं. त्यांनी लिहिलं की, "मी वर्षातील 365 दिवस व्यायाम करतो. मात्र काही होऊ दे मी 20 मे रोजी मतदान करणार आहे. तुम्हाला काय करायचे आहे ते करा, पण मतदान करा. आपल्या भारत मातेला त्रास देऊ नका.. भारत माता की जय." 5व्या टप्प्यात मुंबईत लोकसभेच्या 6 जागांवर निवडणूक होणार आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुका 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत सात टप्प्यात होणार आहेत.

हेही वाचा :

  1. टीव्ही अभिनेत्री पवित्रा जयरामच्या मृत्यूनंतर कथित बॉयफ्रेंड चंद्रकांत उर्फ चंदूनं केली आत्महत्या - CHANDU DIES BY SUICIDE
  2. सशस्त्र रक्षकांसह सलमान खानची एअरपोर्टवर एन्ट्री, जॅकलिन फर्नांडिस कान्सला रवाना - Salman Khan
  3. कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतीय स्टार्सचा जलवा... - Cannes 2024 Film Festival
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.