महाराष्ट्र

maharashtra

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे 14 महिन्यांनंतर टी-20 मध्ये पुनरागमन

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 8, 2024, 8:44 PM IST

भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यानंतर 11 जानेवारीपासून टी-20 मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली 14 महिन्यांनंतर टी-20 क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहेत. या दोघांचेही टी-20 मध्ये उत्तम रेकॉर्ड आहेत.

Virat Kohli and rohit sharma
विराट कोहली आणि रोहित शर्मा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली T20 मधून निवृत्त होणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून चांगलच उधाण आल्याच पाहायला मिळाल. पण, या चर्चांना आता पूर्ण-विराम मिळाला. आगमी अफगाणिस्तानविरूद्ध होणाऱ्या T20 मालिकेसाठी टीम इंडियाची काल रविवार (७ जानेवारी)रोजी घोषणा झाली. यामध्ये रोहीत आणि कोहलीच्या चाहत्यांसाठी सुखद बाब म्हणजे दोन्ही खेळाडूंचे T20 संघात पुनरागमन झालय.

हार्दिकचं स्वप्न स्वप्नचं राहील : रोहीत शर्माच्या चाहत्यांसाठी आनंदाची खास गोष्ट म्हणजे या T20 मालिकेत रोहित शर्माच कर्णधार असणार आहे. त्यामुळे रोहितचे चाहते मोठ्या आनंदात आहेत. त्यानंतर आता चाहत्यांकडून सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय. तसेच, मोठ्या प्रमामात या विषयावर मिम्सचाही पाऊस पडतोय. हार्दिक पांड्याचं स्वप्न स्वप्नच राहिल्याचं मीम तुफान व्हायरल होतय. हार्दिक पांड्या, विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यावरील मीम्स पाहून तुम्हीही हसून- हसून लोटपोट व्हाल अशी स्थिती आहे.

टीम इंडियाची कमान सांभाळणार : रोहित शर्मा आणि विराट कोहली हे शेवटचे नोव्हेंबर २०२२ मध्ये टी-२० फॉरमॅटमध्ये टीम इंडियाकडून खेळताना दिसले होते. या दोन खेळाडूंच मोठ्या विश्रांतीनंतर पुनरागमन झालय. विराट कोहली आणि रोहित शर्मा या वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकातही खेळणार असल्याचं सांगण्यात येतय. एवढेच नाही तर रोहित पुन्हा एकदा टी-२० फॉरमॅटमध्ये टीम इंडियाची कमान सांभाळणार आहे.

विरोधी संघ कायम बॅकफूटवर : टी-20 मध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीला संधी मिळण्याचे एक कारण म्हणजे एकदिवसीय विश्वचषकातील टीम इंडियाची उत्कृष्ट कामगिरी हेच आहे. रोहित शर्माने केवळ संघाचे नेतृत्व केले नाही, तर सलामीवीर म्हणूनही त्याची कामगिरी उत्तम राहीली. रोहित शर्माने जवळपास प्रत्येक सामन्यात संघाला चमकदार सुरुवात करून दिली. त्यामुळे विरोधी संघ कायम बॅकफूटवर गेले. तसेच, इतर फलंदाज वर्चस्व गाजवण्यात यशस्वी झाले.

चॅम्पियन बनवण्याची जबाबदारी : विराट कोहलीने प्रत्येक सामन्यात संघाला उत्कृष्ट नियंत्रणात ठेवलं. विराट कोहली या काळात हिट ठरला. त्याने स्पर्धेत 700 हून अधिक धावा केल्या. याशिवाय गेल्या 1.5 वर्षात विराट कोहलीने प्रत्येक फॉरमॅटमध्ये अप्रतिम कामगिरी केलीय. रोहित शर्माला रिकॉल करताना निवडकर्त्यांना विराट कोहलीला दुर्लक्ष करता आले नाही. आता 17 वर्षांनंतर टीम इंडियाला चॅम्पियन बनवण्याची जबाबदारी रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या खांद्यावर असणार आहे.

हेही वाचा :

1एलिस पेरीनं 300व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात हिसकावला भारताकडून विजय; मालिकेत 1-1 बरोबरी

2भारतातील अशी ठिकाणं ज्यासमोर 'मालदीव'ही ठरेल फिकं

3बिल्किस बानोचा संघर्ष हा अहंकारी भाजपा सरकारविरोधातील न्यायाच्या विजयाचं प्रतीक - राहुल गांधी

ABOUT THE AUTHOR

...view details