महाराष्ट्र

maharashtra

रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्लांना झाल्या जुळ्या मुलीं, फोटोंसह कळवली मुलींचे नावे

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 27, 2023, 4:10 PM IST

Rubina Dilaik have twins : रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला यांनी सोशल मीडियावर त्यांच्या जुळ्या मुली जीवा आणि इधा यांच्यासोबतचे पहिले फोटो शेअर केले. या जोडप्याने जाहीर केले की त्यांना गेल्या महिन्यात जुळ्या मुली झाल्या आहेत.

Rubina Dilaik have twins
रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला

मुंबई- Rubina Dilaik have twins : टेलिव्हिजन अभिनेत्री रुबिना दिलैक आणि तिचा जोडीदार अभिनव शुक्ला यांनी 27 नोव्हेंबर रोजी आपल्या जुळ्या मलींचे स्वागत केले. या मुली 27 डिसेंबर रोजी एक महिन्याचे झाल्यामुळे त्यांनी या मुलींचे नावे जीवा आणि इधा असल्याचे जाहीर केले. बुधवारी चार जणांचा एक सुंदर कौटुंबिक फोटो शेअर करून त्यांच्या आनंदी क्षणांची झलक सोशल मीडियावर दाखवली.

इंस्टाग्रामवर रुबिनाने तिच्या चाहत्यांशी शेअर केले की इधा आणि जीवा आज एक महिन्याचे झाल्या आहेत. यासाठी जोडप्याने एका खास पूजेचे आयोजन केले होते. फोटोंची मालिका टाकताना, रुबिनाने कॅप्शनमध्ये लिहिले, "आमच्या मुली, जीवा आणि इधा आज एक महिन्याच्या झाल्या आहेत हे सांगताना खूप आनंद होत आहे.... गुरुपूरबच्या शुभ दिवशी ब्रह्मांडने आम्हाला आशीर्वाद दिला! आमच्या देवदूतांसाठी तुमच्या शुभेच्छा पाठवा."

रुबिनाच्या गरोदरपणाच्या बातम्या अनेक दिवसांपासून इंटरनेटवर फिरत होत्या. 'छोटी बहू' फेम अभिनेता आणि तिचा पती अभिनव शुक्ला यांना जुळ्या मुलींचा आशीर्वाद आधीच मिळाला आहे, असा अंदाज त्यांच्या चाहत्यांनी बांधला होता. परंतु या जोडप्याने त्याबद्दल मौन बाळगणे पसंत केले. रुबिनाच्या ट्रेनरने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चुकीने ही बातमी उघड केली होती.

रुबिनाने तिच्या गर्भधारणेच्या संपूर्ण प्रवासात 'किसी ने बताया नही' नावाचे पॉडकास्ट यशस्वीरित्या होस्ट केले. टेलिव्हिजन उद्योगातील लोकप्रिय व्यक्ती तिच्या कार्यक्रमात पाहुणे म्हणून दिसल्या होत्या. या कार्यक्रमात त्यांनी पालकत्वाविषयी त्यांच्या स्वतःच्या अनुभवांबद्दल सांगितले. यापैकी एका एपिसोडदरम्यान रुबिनाने जुळ्या मुलांची अपेक्षा असल्याची बातमी उघड केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details