ETV Bharat / entertainment

'सालार'ची जगभरात धूम, बॉक्स ऑफिसवर केली 'इतकी' कमाई

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 27, 2023, 2:34 PM IST

Salaar Box Office Collection Day 5: साऊथ अभिनेता प्रभास अभिनीत 'सालार : पार्ट 1 - सीझफायर' रिलीज होऊन 5 दिवस झाले आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई सुरू आहे. हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.

Salaar Box Office Collection Day 5
सालार बॉक्स ऑफिस कलेक्शन

मुंबई - Salaar box office collection day 5 : साऊथ अभिनेता प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन स्टारर 'सालार: पार्ट 1 - सीझफायर' चित्रपटगृहांमध्ये शानदार कमाई करत आहे. या चित्रपटानं सहा दिवसात जगभरात 400 कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. 'सालार' चित्रपट रोज दुहेरी अंकांची कमाई करत असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहेत. 'सालार' चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी होताना दिसत आहेत. या अ‍ॅक्शन ड्रामानं पहिल्या दिवशी जगभरात 178.7 कोटी रुपयांची ओपनिंग केली. 2023 चा आतापर्यंतचा सर्वात मोठा भारतीय ओपनिंग करणार हा चित्रपट ठरला आहे.

'सालार'चं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन : प्रशांत नील यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शिन केलंय. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये रिलीज झाला आहे. प्रशांत नीलच्या चित्रपटानं हिंदीतही 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 90.7 कोटीची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 56.35 कोटी, तिसऱ्या दिवशी 62.05 कोटी, चौथ्या दिवशी 46.3 कोटी, पाचव्या दिवशी 25.13 कोटी कमाई केली. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 278.90 कोटी झालंय. हा चित्रपट रिलीजच्या सहाव्या दिवशी जोरदार कमाई करू शकतो.

जगभरातील एकूण कलेक्शन : 'सालार'च्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटानं 450 कोटींचा आकडा पार केला. 5 दिवसांत हा चित्रपट परदेशातील बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा टप्पा पार करण्यात यशस्वी होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. होंबळे फिल्म्सची निर्मिती असलेला 'सालार' हा चित्रपट 400 कोटींच्या प्रचंड बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. प्रभासशिवाय या चित्रपटात श्रुती हासन, जगपती बाबू, पृथ्वीराज सुकुमारन, माइम गोपी, श्रिया रेड्डी आणि इतर अनेक कलाकार आहेत. या चित्रपटामध्ये प्रभास हा अ‍ॅक्शन मोडमध्ये आहे.

हेही वाचा :

  1. शाहरुख खान स्टारर 'डंकी'नं वाजवला जगभरात डंका, केली 'इतकी' कमाई
  2. ऑस्कर विजेता 'पॅरासाइट' स्टार ली सन-क्यूनचे धक्कादायक निधन
  3. भाईजानच्या वाढदिवसानिमित्त गॅलक्सी बाहेर चाहत्यांची अलोट गर्दी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.