ETV Bharat / entertainment

आमिर खानची मुलगी आयरा खानच्या लग्नाचा पहिला कार्यक्रम पडला पार

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 27, 2023, 1:44 PM IST

Aamir khan daughter pre wedding pics : अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान ही लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. आता लग्नातील काही विधी पार पडत आहेत.

Aamir khan daughter pre wedding pics
आमिर खानच्या मुलीचे प्रीवेडिंग फोटो

मुंबई - Aamir khan daughter pre wedding pics : अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजचे जानेवारी 2024 ला लग्न करणार आहे. आता आमिर खानच्या मुलीच्या लग्नातील काही विधी सुरू झाले आहेत. आयरा जिम ट्रेनर नुपूर शिखरेसोबत लग्न करत असून तिच्या विवाहपूर्व विधीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नोव्हेंबर 2023 मध्ये आयरा आणि नुपूर शिखरेचा साखरपुडा पार पाडला होता. या जोडप्याच्या एंगेजमेंटला फक्त कुटुंबातील सदस्य आणि खास पाहुणेच उपस्थित होते. आयरा आणि नुपूरच्या लग्नाचा पहिला कार्यक्रम मंगळवारी पार पडला.

Aamir khan daughter pre wedding pics
आमिर खानच्या मुलीचे प्रीवेडिंग फोटो

आयरा आणि नुपूरच्या लग्नाचा पहिला कार्यक्रम : आयरा आणि नुपूर शिखरेचा साखरपुडा नोव्हेंबर 2023 मध्ये पार पडला होता. या जोडप्याच्या एंगेजमेंटला फक्त कुटुंबातील सदस्य आणि खास पाहुणेच उपस्थित होते. दरम्यान, आयरा आणि नुपूरच्या लग्नाचा पहिला कार्यक्रम मंगळवारी पार पडला. या कार्यक्रमात आमिर खानची दुसरी पत्नी किरण राव ही मुलगा आझाद खानसोबत पोहोचली होती. व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये किरण राव जेवणाच्या टेबलावर दिसत आहे. या कार्यक्रमात अनेकजण उपस्थित होते.

आयरा खान आणि नुपूर शिखरेचं लग्न : याशिवाय आयराचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती हलक्या लाल रंगाच्या साडीत दिसत आहे. यावर तिनं लाईट मेकअप केला आहे. या लूकला आणखी खास बनविण्यासाठीनं तिनं तिचे केस मोकळे सोडले आहेत. लाल टिकली इयररिंग आणि नेकलेससह तिनं तिचा हा लूक पूर्ण केला आहे. याशिवाय नुपूरनं काळ्या रंगाच्या धोतीवर लाल रंगाचा कुर्तासह सोनेरी रंगाचे जाकीट घातले आहे. यामध्ये तो खूप देखणा दिसत आहे. या कार्यक्रमात आयराची मैत्रिण मिथिला पालकरनेही हजेरी लावली होती. आमिर खानच्या मुलीचे लग्न 3 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. या लग्नात अनेक सेलिब्रेटी उपस्थित राहणार असल्याचं समजत आहे.

हेही वाचा :

  1. 'लव्हबर्ड्स' तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा एकमेकांच्या सहवासात करणार नव्या वर्षाचं स्वागत
  2. ऑस्कर विजेता 'पॅरासाइट' स्टार ली सन-क्यूनचे धक्कादायक निधन
  3. भाईजानच्या वाढदिवसानिमित्त गॅलक्सी बाहेर चाहत्यांची अलोट गर्दी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.