महाराष्ट्र

maharashtra

Supriya Sule Replied Narayan Rane : 'तारीख पे तारीख', हे सिनेमामध्ये बरं : नारायण राणेंना सुप्रिया सुळेंचं प्रत्त्युत्तर

By

Published : Apr 20, 2022, 9:51 PM IST

Updated : Apr 20, 2022, 10:56 PM IST

येत्या जून महिन्यात राज्य सरकार कोसळणार ( state government will collapse in June ) असल्याचा दावा करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंना राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे. 'तारीख पे तारीख', हे सिनेमामध्ये बरं, असं सुळे यांनी म्हटलं ( Supriya Sule Replied Narayan Rane ) आहे.

Supriya Sule
खासदार सुप्रिया सुळे

सोलापूर- राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आज सोलापूर दौऱ्यावर आल्या ( Supriya Sule Solapur Visit ) होत्या. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. वाशीम जिल्ह्यात असतांना नारायण राणे यांनी सांगितलं होतं की, येत्या जून महिन्यात राज्य सरकार ( state government will collapse in June ) कोसळणार. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी सोलापुरात राणेंना प्रत्त्युत्तर दिले, 'तारीख पे तारीख', हे सिनेमा मध्ये बर वाटतंय. रिअलमध्ये नाही. सत्ता आली काय आणि गेली काय, आम्ही जनतेची कामे करत राहणार', असा टोला खासदार सुप्रिया सुळेंनी राणेंना लगावला ( Supriya Sule Replied Narayan Rane ) आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे काय म्हणाले होते: कोकण किनारपट्टीवर जूनमध्ये वादळसदृश परिस्थिती असते. वादळ आलं की झाडं फांद्यासह कोसळतात. त्याच पार्श्वभूमीवर येत्या जून महिन्यात राज्यात मोठे राजकीय वादळ येणार असून, मुख्यमंत्री हे फांदीवर आहेत. खोडावर नाहीत. त्यामुळे हे सरकार जूनमध्ये पडणार हे नक्की, अशी शक्यता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वाशीममध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली होती.

सुप्रिया सुळे म्हणाल्या :मी शरद पवार यांची मुलगी आहे. सत्ता आली काय आणि गेली काय, आम्ही जनतेसाठी काम करू. विरोधक फक्त तारीख पे तारीख देत आहेत. तारीख पे तारीख हे सनी देवलच्या सिनेमामध्ये बरं वाटतं. रिअल लाईफमध्ये नाही.

हेही वाचा : Narayan Rane : जून महिन्यात राज्य सरकार कोसळणार.. मंत्री नारायण राणेंकडून नवीन तारीख जाहीर

Last Updated : Apr 20, 2022, 10:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details