Narayan Rane : जून महिन्यात राज्य सरकार कोसळणार.. मंत्री नारायण राणेंकडून नवीन तारीख जाहीर

author img

By

Published : Apr 19, 2022, 4:58 PM IST

जून महिन्यात राज्य सरकार कोसळणार.. मंत्री नारायण राणेंकडून नवीन तारीख जाहीर

गेल्या दोन वर्षांपासून या तारखेला राज्य सरकार पडणार, त्या महिन्यात पडणार अशी तारीख देणाऱ्या मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा जून महिन्यात राज्य सरकार कोसळणार ( state government will collapse in June ) असल्याचे सांगत नवीन तारीख दिली ( Minister Narayan Rane ) आहे. वाशीममध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत ( Narayan Rane In Washim ) होते.

वाशीम : कोकण किणारपट्टीमध्ये जूनमध्ये वादळसदृश परिस्थिती असते. वादळ आलं की झाडं फांद्यासह कोसळतात. त्याच पार्श्वभूमीवर येत्या जून महिन्यात राज्यात मोठे राजकीय वादळ येणार असून, मुख्यमंत्री हे फांदीवर आहेत, खोडावर नाहीत. त्यामुळं हे सरकार जूनमध्ये पडणार हे ( state government will collapse in June ) नक्की, अशी शक्यता केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Minister Narayan Rane ) यांनी वाशिममध्ये आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त ( Narayan Rane In Washim )केली.


राज ठाकरेंची भूमिका योग्य : राज ठाकरे यांची भोंग्याची भूमिका योग्य असून, प्रत्येकाने परवानगीने भोंगे लावावेत. भोंग्यावरून राज ठाकरे यांना धमकी येत आहे. त्यावर नारायण राणे म्हणाले की, शिवसेना आता वाघ राहिला नसून, ते आता मेंढ्या झाल्या आहेत. त्यांच्यामध्ये धमकी देण्याची ताकदच उरली नसल्याची टीका त्यांनी शिवसेनेवर ( Narayan Rane On Raj Thackeray Security ) केली.

जून महिन्यात राज्य सरकार कोसळणार.. मंत्री नारायण राणेंकडून नवीन तारीख जाहीर


वाशीमसाठी योजना : माझ्या घरावरील कारवाई ही सूड बुद्धीने करण्यात येत असल्याचे नारायण राणे म्हणाले. दरम्यान माझ्या खात्यामार्फत जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार असून, आत्मनिर्भर भारतासाठी 30 योजनांची वाशिमसारख्या आकांक्षीत जिल्ह्यात अंमलबजावणी करणार असल्याचे मंत्री नारायण राणे यांनी सांगितलंय.

हेही वाचा : नारायण राणेंच्या अधिश बंगल्यावर कधीही पडू शकतो हातोडा?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.