महाराष्ट्र

maharashtra

Pune Load Shedding : पुणेकरांना बसणार का भारनियमनाचा शॉक? कशी आहे पुण्यातील भारनियमनाची परिस्थिती? जाणून घ्या

By

Published : Apr 22, 2022, 3:48 PM IST

एकीकडे राज्यभरात भारनियमन सुरु असताना दुसरीकडे पुण्यात भारनियमन होत नसल्याने पुणेकर मात्र निवांत आहेत. राज्यात विजेचे संकट वाढत असताना पुण्यातही भारनियमन होणार ( Will there be load shedding in Pune ) का? असा सवाल उपस्थित होत आहे. यापार्श्वभूमीवर पुण्यातील परिस्थितीचा ( Power situation in Pune ) आढावा घेतला आहे ईटीव्ही भारत प्रतिनिधीने..

Power situation in Pune
पुण्यातील विजेची परिस्थिती

पुणे : एकीकडे राज्यात अघोषित भारनियमन सुरू झालं आहे. मात्र, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोळशाचा तुटवडा आणि बाजारात वीज उपलब्ध नसल्याने भारनियमनाची समस्या निर्माण झाली असल्याचं स्पष्टीकरण दिल आहे. तर पुणे शहराचा विचार करता पुण्यात लाईट जाण्याच्या प्रमाणत मोठी वाढ झाली ( Unannounced load shedding in Pune ) आहे. मात्र, अधिकारी सांगतात की, भारनियनमन ( Will there be load shedding in Pune ) नाही. काय आहे पुण्यातील भारनियमनाचे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही ( Power situation in Pune ) केला.

राज्यात विजेच्या मागणीत होत आहे वाढ : गेल्या काही दिवसापासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे विजेच्या मागणीत देखील मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. ही मागणी वाढत जाऊन यंदाच्या उन्हाळ्यात विजेची मागणी ३० हजार मेगावॅटपर्यत पोहोचणार असल्याचं देखील तज्ञांकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पुन्हा भारनियमनाचे नियोजन सुरू झाले आहे. राज्यात सध्या विजेची मागणी २८ हजाराच्या आसपास आहे. काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढला आहे. त्यामुळे विजेची मागणी पुढील काही दिवसांत ३० हजार मेगावॅटपर्यंत वाढणार आहे.

पुण्यात भारनियमन होणार का ?

पुण्यात भारनियमन नाही, मात्र अधिकाऱ्यांचा बोलण्यास नकार :पुणे शहराचा विचार केला असता शहरात सध्या तरी कुठल्याही प्रकारच भारनियमन नाही असं अधिकारी सांगत आहेत. पुण्याला जी वीज लागते ती सध्या मुबलक प्रमाणात उपलब्ध ( Demand for electricity in Pune ) आहे, असं सांगत शासनाकडून याबाबतच कुठलच परिपत्रक आल नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

सामान्य पुणेकरांना ही भीती : यावर बोलताना सामान्य पुणेकरांना एक वेगळीच भीती सतावत आहे. शहरात आता भारनियमन नाही मात्र, ज्यावेळी विजेची मागणी वाढेल आणि पुरवठा कमी होईल त्यावेळी काय? असा प्रश्न सामान्य पुणेकरांना पडला आहे . पुण्यात जरी आता भारनियनमन नसलं तरी सारखी जी लाईट जात आहे त्यालाच अघोषित भारनियमन म्हणून पुणेकर संबोधत आहेत.

हेही वाचा : वीज वापरली तर पैसे भरावेच लागतील - ऊर्जामंत्री नितीन राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details