महाराष्ट्र

maharashtra

Schoolgirl Attack in Pune : एकतर्फी प्रेमातून पुण्यात शाळकरी मुलीवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

By

Published : Mar 14, 2022, 3:10 PM IST

पुण्यातील वडगाव शेरी परिसरात एकतर्फी प्रेमातून धक्कादायक प्रकार ( One Sided Lover Attack on schoolgirl ) घडला आहे. येथील दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका मुलीवर तरुणाने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली ( Pune Lover Attack on schoolgirl ) आहे. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Out of one sided love attack girl sharp weapon
एकतर्फी प्रेमातून मुलीवर धारदार शस्त्राने हल्ला

पुणे - पुण्यातील वडगाव शेरी परिसरात एकतर्फी प्रेमातून धक्कादायक प्रकार ( One Sided Lover Attack on schoolgirl ) घडला आहे. येथील दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका मुलीवर तरुणाने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली ( Pune Lover Attack on schoolgirl ) आहे. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नव्हता.

शाळेच्या आवारातच घडली घटना -

हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर वडगाव शेरी येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सोमवारी सकाळी हा प्रकार घडला असून शाळेच्या आवारातच हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

काय आहे नेमक प्रकरण -

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शेरी येथील एका शाळेच्या आवारात हा सगळा प्रकार घडला आहे. पीडित मुलगी शाळेत असताना आरोपीने शाळेत जाऊन धारधार शस्त्राने तिच्यावर वार केले आहेत. या हल्ल्यात विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर वडगाव शेरी येथील सिटी हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. येरवडा पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा -गळ्यावर चाकू ठेवून केली सव्वादहा लाखाची लूट... स्वीगी बॉयचा प्रताप

ABOUT THE AUTHOR

...view details