महाराष्ट्र

maharashtra

Police commit suicide in Nagpur : लग्न मोडल्याने नैराश्य आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने केली आत्महत्या

By

Published : Apr 25, 2022, 9:45 AM IST

Updated : Apr 25, 2022, 9:55 AM IST

लग्न मोडल्यामुळे नैराश्य आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने ( Police commit suicide in Nagpur ) रिकाम्या पोलीस क्वार्टरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या ( Police suicide due to depression after marriage break ) केली.

police commit suicide in nagpur
किरण सलामे आत्महत्या नागपूर

नागपूर - लग्न मोडल्यामुळे नैराश्य आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने ( Police commit suicide in Nagpur ) रिकाम्या पोलीस क्वार्टरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या ( Police suicide due to depression after marriage break ) केली. किरण अशोक सलामे (वय 30) असे ( Kiran Salame suicide nagpur ) आत्महत्या करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते सदर पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते.

हेही वाचा -BJP Lantern March In Nagpur : अघोषित भारनियमन बंद करण्याच्या मागणीसाठी नागपुरात भाजपचा 'कंदील मार्च'

किरण सलामे 2014 मध्ये पोलीस दलात भर्ती झाले होते. गेल्या वर्षभरापासून ते सदर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. किरणचे वर्धा येथील एका मुलीसोबत लग्न जुळले होते. जून महिन्यात लग्नाचा मुहूर्त असल्याने पत्रिका देखील वाटण्यात आल्या होत्या मात्र, मुलीने लग्न मोडून दुसऱ्यासोबत संसार थाटल्याने किरणला जबर मानसिक धक्का बसला. त्यांनी धरमपेठ येथील पोलीस वसाहतीच्या रिकाम्या क्वार्टरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

सुसाईड नोट सापडली- किरण सलामे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. जीवनात संघर्ष करून इथपर्यंत पोहचलो, मात्र आता मी थकलो आहे, असे त्या सुसाईड नोटमध्ये लिहिलेले आहे. माझ्या मृत्यूसाठी कुणालाही जबाबदार धरू नका, असे देखील त्यात नमूद आहे.

हेही वाचा -chandrashekhar bawankule : 'शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी माझ्या घरासमोर हनुमान चालीसा वाचली तर...'

Last Updated : Apr 25, 2022, 9:55 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details