ETV Bharat / city

BJP Lantern March In Nagpur : अघोषित भारनियमन बंद करण्याच्या मागणीसाठी नागपुरात भाजपचा 'कंदील मार्च'

author img

By

Published : Apr 24, 2022, 10:51 PM IST

Kandil March
कंदील मार्च

अघोषित सुरु असलेले भारनियमन बंद ( Load Shedding In Nagpur ) करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे नागपूर शहरात 'कंदील मार्च' काढण्यात ( BJP Lantern March In Nagpur ) आला. भारनियमन बंद करून सेक्युरिटी डिपॉझिट परत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

नागपूर : अघोषितपणे सुरू असलेल्या भारनियमनाच्या विरोधात ( Load Shedding In Nagpur ) भारतीय जनता पक्षाने आंदोलनाचे हत्यार उपसलं आहे. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आज नागपूरच्या संविधान चौकात कंदील मार्च काढण्यात ( BJP Lantern March In Nagpur ) आला. यावेळी नागपुरातील भाजपचे अनेक आमदार आणि स्थानिक नेते उपस्थित होते. राज्यातील वीज टंचाईच्या समस्येला ऊर्जा विभाग आणि राज्य सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार असल्याचा आरोप माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

राज्यात अघोषित भारनियमनाचे सत्र सुरू आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले असून, राज्याच्या काही भागात तब्बल सहा तास वीज नसल्याने जनता बेहाल झाली आहे. असे असताना सुरक्षा अनामत रक्कम दुप्पट करून सरकारने ग्राहकाच्या खिशाला कात्री लावण्याचा राक्षसी निर्णय घेतला आहे असा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. ही सक्तीची वसुली ताबडतोब थांबविण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाकडून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे.

नागपुरात भाजपचा 'कंदील मार्च'

विजेचा खेळखंडोबा : सुमारे तीन आठवड्यांपासून राज्यात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. सरकारी कार्यालयांची हजारो कोटींची थकबाकी आहे. तरी देखील सामान्य ग्राहकांची थकबाकीच्या नावावर वसुली आणि वीज कापण्याची कारवाई केली जाते आहे. ढिसाळ व्यवस्थापनामुळे कोळसा टंचाई निर्माण झाली आहे. ऐन उन्हाळ्यात सक्तीने बंद ठेवलेली वीज निर्मिती संयंत्रे अशा बेदरकार कारभारामुळे राज्याचे वीज व्यवस्थापन कोलमडले असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.

२७ वीजनिर्मिती संयंत्रे बंद : आजच्या स्थितीत राज्यातील सुमारे २७ वीजनिर्मिती संयंत्रे बंद आणि काही जेमतेम चालवली जात आहेत. मुळात विजेची मागणी कमी असताना या संयंत्रांची देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे होते. परंतु सरकार निष्क्रिय होते म्हणून उन्हाळ्यात वीजटंचाईच्या समस्येला महाराष्ट्रातील जनतेला सामोरे जावे लागते आहे असा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.

हेही वाचा : Power Shortage In Maharashtra : महाराष्ट्र होणार घामाघूम.. ऐन उन्हाळ्यात कोळशाची टंचाई.. वीज निर्मिती ठप्प..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.