ETV Bharat / politics

पोपट सोबत असल्यास भविष्यवाणीला महत्व...; पृथ्वीराज चव्हाण यांना उमेश पाटलांचा सल्ला - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 16, 2024, 10:55 PM IST

Updated : May 16, 2024, 11:03 PM IST

Lok Sabha Election 2024 : काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी लोकसभेत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील आणि महायुतीला 15 ते 16 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. यावर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ता उमेश पाटील यांनी जोरदार पलटवार केलाय.

Prithviraj Chavan
पृथ्वीराज चव्हाण (Mumbai Reporter)

प्रतिक्रिया देताना उमेश पाटील (Mumbai Reporter)

मुंबई Lok Sabha Election 2024 : मुंबईत लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होणार आहे. प्रचार करण्यासाठी अवघे दोन दिवस हातात असताना, महाविकास आघाडी इंडिया आघाडीची आणि महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भव्य सभा मुंबईत पार पडणार आहे. राज्यात महायुतीला 15 ते 16 जागा आणि महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील असा अंदाज राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवला होता. पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी पोपट सोबत घेऊन भविष्यवाणी सांगावं, निदान त्यामुळं तुमच्यावर काहीजण विश्वास ठेवतील असं म्हणत उमेश पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा समाचार घेतलाय.

तुमच्या पाठीशी एकही आमदार नाही : राज्यातील पाचवा टप्प्यातील मतदान होणं बाकी आहे, अशा प्रकारची भविष्यवाणी करून मतदारांना प्रभावित करण्याचं काम पृथ्वीराज चव्हाण करत आहेत. शरद पवार यांच्या इतका अनुभव चव्हाण यांना नाही. त्यांनी फक्त राज्याचे मुख्यमंत्री पद भूषविल्यामुळं त्यांना टीआरपी मिळतो. राज्यासंदर्भात त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. आपल्या उंची एवढं त्यांनी बोलावं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठीशी 40 ते 50 आमदार आहेत. तुमच्या पाठीशी तुमच्या पक्षाचा एक आमदार नसल्याचा टोला त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना लगावला. तात्कालीन मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी षडयंत्र करून, कराड दक्षिणची जागा विलास काका पाटील-उंडाळकर यांना एका खून खटल्यात सहआरोपी करत त्यांच्या कुटुंबियांना अडचणीत आणल्याचं पाप केलं होतं असा आरोप, उमेश पाटील यांनी केलाय.



पोपट सोबत असल्यास भविष्यवाणीला महत्व : काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या सोबत पोपट घेऊन भविष्यवाणी करावी. त्यानिमित्तानं पोपटाच्या नादानं तरी काहीजण तुमच्यावर विश्वास ठेवतील असा टोला त्यांनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भाष्य करण्याच्या भानगडीत पडू नका. तसेच आपली सार्वजनिक जीवनातील पत देखील तपासावी अशी टिका, उमेश पाटील यांनी केलीय.


होर्डिंगसंदर्भात कायदा आणावा : लोकसभा निवडणुकीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे देशभर सुरु आहे. दौऱ्याचे नियोजन काटेकोरपणे केलेलं असतं. त्यामुळं सुरक्षेच्यादृष्टीनं घाटकोपर दुर्घटनेच्या ठिकाणी अशी परवानगी दिली गेली नाही. यापूर्वी या देशाचे दोन पंतप्रधान सुरक्षेच्या कारणास्तव गमावलेले आहेत. म्हणून सुरक्षा यंत्रणा काळजी घेत असते. त्यामुळंच प्रचाराचा कार्यक्रम सोडून तिथे भेट देणं शक्य झालं नसावं. येत्या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं बेकायदेशीर होर्डिंग संदर्भात कायदा आणावा अशी मागणी, राष्ट्रवादी काँग्रेस करेल असं उमेश पाटील यांनी म्हटलंय.

हेही वाचा -

  1. विकासाच्या योजना घेऊन मतदारांसमोर जाणार; महायुतीचे लोकसभेचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा यांचा निर्धार - Hemant Savara Announcement
  2. लोकसभा निवडणूक; ...यांच्यामुळं मोदींना रोडवर उतरावं लागलं?; काय आहेत कारणे? घ्या जाणून - Modi have to come on road in Mumbai
  3. पाचव्या टप्प्यातील उमेदवारांच्या प्रचारात अजित पवार यांचा सहभाग नसल्यानं चर्चांना उधाण - Lok Sabha Election 2024
Last Updated :May 16, 2024, 11:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.