महाराष्ट्र

maharashtra

The Longest Tunnel : सर्वांत लांब बोगदा; पनवेल-कर्जत मार्गावर २.६० किमी लांबीचा असणार बोगदा

By

Published : Mar 23, 2022, 8:07 AM IST

पनवेल-कर्जत रेल्वे मार्ग तयार झाल्यास, सीएसएमटी-कर्जत व्हाया पनवेल रेल्वे मार्गाचा पर्याय तयार होईल. येत्या काही वर्षात पनवेल-कर्जत दरम्यान वावर्ले येथील २.६० किमी लांबीचा बोगदा मुंबई महानगरातील सर्वाधिक लांबी बोगदा असणार असल्याची माहीती एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

The longest tunnel on the Panvel-Karjat route
पनवेल-कर्जत मार्गावर होणार सर्वात लांब बोगदा

मुंबई - उपनगरीय रेल्वे ( Suburban Railway ) मार्गावरील सर्वात जास्त लांबीचा ठाणे-दिवा दरम्यानचा १. ३ किमी लांबीचा पारसिक बोगदा ( Parsik Tunnel ) आहे. मात्र, आता पारसिक बोगद्यापेक्षा सर्वधिक लांबीचा बोगदा पनवेल-कर्जत ( Panvel-Karjat route ) दरम्यान उभारण्यात येणार आहे. पनवेल-कर्जत दुहेरी रेल्वे मार्गाच्या ( dual-line railway tunnel ) कामानिमित्त तीन बोगदे तयार केले जाणार आहेत. यांपैकी एक वावर्ले येथील बोगदा २.६० किमी लांबीचा तयार करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) ( Mumbai Railway Vikas Corporation ) दिली आहेत.

सर्वाधिक लांब बोगदा


पनवेल ते कर्जत सध्या एकच रेल्वे मार्ग असल्याने मेल ,एक्सप्रेस आणि मालवाहतुक याच मार्गावरुन हाेते. कर्जत आणि पनवेलमधील प्रवाशांसाठी व्हाया ठाणे किंवा कुर्ला मार्गाने लोकलने जावे लागते. रस्ते मार्ग अतिशय वेळखाऊ आणि खर्चिक असल्याने पनवेल ते कर्जत अशी थेट लोकल सुरु करण्याची मागणी प्रवाशांची आहे. त्यासाठी येथे एमयूटी ३ अंतर्गत पनवेल ते कर्जत दुहेरी रेल्वे मार्ग हाती घेतला आहे. या प्रकल्पामुळे कर्जत आणि पनवेल येथील प्रवाशांसाठी सुखकर होणार आहे. सध्या सीएसएमटीहून कर्जतला ( CSMT To Karjat ) जाणाऱ्या प्रवाशांसाठी, पनवेल-कर्जत रेल्वे मार्ग तयार झाल्यास, सीएसएमटी-कर्जत व्हाया पनवेल रेल्वे मार्गाचा पर्याय तयार होईल. येत्या काही वर्षात पनवेल-कर्जत दरम्यान वावर्ले येथील २.६० किमी लांबीचा बोगदा मुंबई महानगरातील सर्वाधिक लांबी बोगदा असणार असल्याची माहीती एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पनवेल-कर्जत मार्गावर होणार सर्वात लांब बोगदा
असा आहे प्रकल्पप्रवाशांचा सुविधेसाठी २०१५ च्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पनवेल-कर्जत दुहेरी रेल्वे मार्ग प्रकल्पास हिरवा कंदील दाखवला. मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनच्या ( Mumbai Railway Vikas Corporation ) माध्यमातून या प्रकल्पाच्या उभारणीसाठी मंजुरी दिली होती. पनवेल-कर्जत दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे मार्गिकेला दोन हजार ७८३ कोटी रुपयांचा अंदाजीत खर्च येणार आहे. काेरोनामुळे या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया आणि प्रत्यक्ष कामे खोळंबली. जानेवारी २०२१ नंतर या कामांना सुरुवात झाली. दुहेरी मार्ग २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. प्रकल्पातील दुहेरी मार्गाचे काम करण्यासाठी सरकारी, खासगी आणि वन अशी १३५.८९३ हेक्टर जमीन आवश्यक आहे. यातील १०१.०९० हेक्टर म्हणजेच ७४.३९ टक्के भूसंपादन झाले असून २५.६१ टक्के भूसंपादन शिल्लक आहे. या प्रकल्पात पादचारी पुलांसह अन्य काही कामांना सुरुवात झाली आहे या मार्गात तीन बोगदे असून त्यासाठी निविदाही काढली आहे. यातील एक वावर्ले बोगदा २.६० किलोमीटर लांबीचा आहे.पारसिक बोगद्याचा असा आहे इतिहास पारसिकचा बोगदा ( Parsik Tunnel ) ठाणे शहराजवळील पारसिकाच्या डोंगरात ( Parsik Hill of Thane ) केलेला बोगदा आहे. पारसिक बोगद्याचे काम १९०६ साली सुरू करून १९१६ मध्ये रेल्वे वाहतूकसाठी बोगदा खुला झाला. मुंबई-कल्याण रेल्वेमार्गाच्या दोन मुख्य मार्गिका यातून जातात. हा बोगदा १.३ किमी लांबीचा असून भारतीय रेल्वेवरील एक किमीपेक्षा जास्त लांबीचा हा पहिला बोगदा होता व बांधला गेला तेव्हा आशियातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लांबीचा बोगदा होता. या बोगद्यामुळे मुंबई ते कल्याणमधील अंतर ९.६ किमीने कमी झाले आहे. आता या बोगद्यातून जलद लोकल ट्रेन जाणे बंद झाले आहे. बोगद्यातून मालगाड्या, एक्स्प्रेस, पार्सल गाड्या जातात.

हेही वाचा : रेल्वेतील सर्वाधिक लांबीची भूमिगत जल वाहिनी होतेय तयार; पावसातही रेल्वे सुरू राहणार असल्याचा दावा

ABOUT THE AUTHOR

...view details