महाराष्ट्र

maharashtra

तानाजी सावंत काय मला सोडतो मी सोडले त्याला - आमदार नितीन देशमुख

By

Published : Jun 25, 2022, 9:55 PM IST

शिवसेनेतील बंडखोरीमुळे राज्यात सत्तास्थापनेची हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेनेच्या राष्ट्रीय कोअर कमिटीची आज बैठक झाली. बैठकीला आमदार नितीन देशमुख यांनी हजर होते. यावेळी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने देशमुख यांच्याशी संवाद साधला. दरम्यान, ज्या आमदारांसाठी शिवसैनिकांनी जिवाचं रान केलं. त्याच शिवसैनिकांना आमदार सोडून पळून गेले. आमदार म्हणजे शिवसैनिक नाही. आमदार म्हणजे मतदार नाही. आता पळून गेल्याने लोकांचा रोष वाढला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांचा विश्वासघात करणे शिवसैनिक अडकले असून त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. आमदारांच्या वागणुकीचे हे परिणाम आहेत असे नितीन देशमुख यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

Shiv sena MLA nitin deshmukh
आमदार नितीन देशमुख यांची प्रतिक्रिया

मुंबई -शिवसेनेतील बंडखोरीमुळे राज्यात सत्तास्थापनेची हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेनेच्या राष्ट्रीय कोअर कमिटीची आज बैठक झाली. बैठकीला आमदार नितीन देशमुख यांनी हजर होते. यावेळी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने देशमुख यांच्याशी संवाद साधला. दरम्यान, ज्या आमदारांसाठी शिवसैनिकांनी जिवाचं रान केलं. त्याच शिवसैनिकांना आमदार सोडून पळून गेले. आमदार म्हणजे शिवसैनिक नाही. आमदार म्हणजे मतदार नाही. आता पळून गेल्याने लोकांचा रोष वाढला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांचा विश्वासघात करणे शिवसैनिक अडकले असून त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. आमदारांच्या वागणुकीचे हे परिणाम आहेत असे नितीन देशमुख यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

आमदार नितीन देशमुख यांची प्रतिक्रिया

यापूर्वी नितीन देशमुखांनी केले होते भाजपावर आरोप - शिवसेनेच्या आमदारांच्या स्वाक्षरीवरून उपस्थित झालेल्या प्रश्नावरून मोठा वाद निर्माण झालेला आहे. आमदार नितीन देशमुख ते गुवाहाटी येथून अकोल्यात परत आले आहेत. ते परत आल्यानंतर त्यांनी आज सायंकाळी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत सांगितले होते की, या सर्व प्रकारामुळे मी विचलित झालो आहे. भारतीय जनता पक्षातर्फे गुजरातमध्ये आमच्या आमदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला, असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यासोबतच गुजरातमध्ये मराठी माणसांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याचेही त्यांनी त्यांच्या सोबत घडलेल्या प्रकारावरून सांगितले होते.

आरोपानंतर झाले होते फोटो व्हायरल - नितीन देशमुखांनी काल पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांवर गंभीर आरोप केले होते. त्यांना बळजबरीने गुरजातमध्ये नेल्याचे ते म्हणाले होते. मात्र, देशमुखांच्या या आरोपानंतर आता शिंदे गटाने या आरोपांवर स्पष्टीकरण दिले होते. देशमुख यांना कोणतीही मारहाण केली असून आम्ही त्यांना विमानाने महाराष्ट्रात पाठवल्याचे म्हटले होते. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details