महाराष्ट्र

maharashtra

घाटकोपरमध्ये दरड कोसळल्याने 6 घरांचे मोठे नुकसान

By

Published : Aug 31, 2021, 5:59 PM IST

Updated : Aug 31, 2021, 10:39 PM IST

सोमवारी रात्री उशिरा अचानक डोंगराचा काही भाग असल्फा भागात बांधलेल्या घरांवर पडला. यात 2 लोकं गंभीर जखमी झाले, तर 5 ते 6 झोपड्यांचे मोठे नुकसाना झाले.

landslide in Ghatkopar
घाटकोपरमध्ये दरड कोसळली

मुंबई - सोमवारी घाटकोपर येथील असल्फा भागात दरड कोसळल्याने 5 ते 6 घरांचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. घरांवर दरड कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, पालिका अधिकारी आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आणि ढिगारा हटवून अडकलेल्यांना बाहेर काढले.

शिवसेना आमदार दिलीप लांडे

हेही वाचा -hawker attack : बरे होऊन आपले काम सुरूच ठेवणार, कल्पिता पिंपळेंनी व्यक्त केला निर्धार

  • सोमवारी रात्री घडली घटना -

सोमवारी रात्री उशिरा अचानक डोंगराचा काही भाग असल्फा भागात बांधलेल्या घरांवर पडला. यात 2 लोकं गंभीर जखमी झाले, तर 5 ते 6 झोपड्यांचे मोठे नुकसाना झाले. घटनेनंतर स्थानिक पोलीस, मुंबई महापालिका अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहचले होते. तसेच अग्निशामक दलाचे जवान दरड बाजुला करण्याचे काम करत आहेत.

मागील वर्षी डोंगराच्या दोन्ही बाजूंना संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. तिसऱ्या बाजूला डोंगराची उंची जास्त आहे, त्यामुळे तेथे संरक्षक भिंत बांधता आली नाही. पण येत्या अर्थसंकल्पात ती देखील बनवली जाईल, असे स्थानिक शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी सांगितले.

हेही वाचा -सरकार सणांच्या नाही, कोरोनाच्या विरोधात; मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांना फटकारले

Last Updated : Aug 31, 2021, 10:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details