मुंबई -अक्षय्य तृतीया ( Akshaya Tritiya 2022 ) हा हिंदू धर्मातील मोठा आणि शुभ सण असा मानला जातो. त्यामुळे हिंदू धर्मिय या दिवशी मोठ्या प्रमाणात सोने खरेदीसाठी पसंती देतात. त्यामुळे उद्या (मंगळवारी) राज्यातच नाही, तर देशभरात सोने बाजारात मोठी उलाढाल ( Large turnover in gold market ) होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केवळ महाराष्ट्रातच जवळपास साडेतीनशे ते चारशे कोटी रुपयाची तर देशभरात हजार ते बाराशे कोटी रुपयांची होणार उलाढाल होण्याची शक्यता व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
गेल्या दोन वर्षापासून देशभरामध्ये असलेला कोविडचा प्रादुर्भावामुळे जवळ जवळ सर्वच व्यवसाय ठप्प झाले होते. त्याचा फटका सोने व्यवसायालाही मोठ्या प्रमाणात बसला होता. मात्र असे असले तरी, कोविडच्या काळामध्ये सोन्याच्या दरात मोठी उसळ पाहायला मिळाली. कोविड काळाच्या आधी 35 ते 36 हजार रुपये तोळे दर असलेले सोने थेट 58 हजारापर्यंत गेले होते. त्यातच कोविड काळामध्ये सामान्य नागरिकांची बंद झालेली आवकामुळे सामान्य नागरिकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली होती. मात्र आता सर्व नियम शिथिल करण्यात आलेले आहेत. सर्वच व्यवसाय आता खुले झाले असून सोने खरेदीत मोठ्या प्रमाणात पैशाची उलाढाल होत आहे. त्यामुळे या अक्षय्य तृतीयापासून मोठ्या प्रमाणात सोने खरेदीकडे लोकांचा ओघ असेल, अशी आशा सोने व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.
अक्षय्य तृतीयानंतर देशभरात होणार मोठी उलाढाल :अक्षय्य तृतीया हा हिंदू धर्मातील सर्वात शुभ सणा पैकी एक सण मानला जातो. या दिवशी हिंदु धरणांचा सोने खरेदीवर जास्त भर असल्यामुळे उद्यापासून सर्वसामान्यांकडून सोने खरेदीची लगबग सुरू होईल, अशी आशा सोने व्यापारी आणि इंडियन बुलियन अंड ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांनी व्यक्त केली आहे. आता सोन्याचा दर 52 हजार 500 रुपयाच्या आसपास असला तरी, उद्या त्यामध्ये किंचितशी वाढ होण्याची शक्यता देखील त्यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे. नुकताच झालेला गुढीपाडवा सणाला देखील सोने खरेदीकडे नागरिकांनी पाठ फिरवली. मात्र उद्यापासून सोने खरेदीत तेजी येईल, असा विश्वास व्यापाऱ्यांना आहे. केवळ मुंबईतच अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर दीडशे कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज आहे. तर तिथेच महाराष्ट्रात 300 कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या सोबतच संपूर्ण देशभरामध्ये हजार ते बाराशे कोटी रुपयेपर्यंत अक्षय तृतीयाच्या सणाला सोने बाजारामध्ये उलाढाल होण्याची शक्यता सोने व्यापारी कुमार जैन यांनी वर्तवली आहे.