ETV Bharat / city

Dada Bhuse comment on Malegaon : मालेगाव विकासाच्या वाटेवर, धार्मिक सलोखा कायम राहील - कृषी मंत्री दादा भुसे

author img

By

Published : May 2, 2022, 1:23 PM IST

Updated : May 2, 2022, 1:51 PM IST

धार्मिक दंगली ही मालेगावची ( Dada Bhuse comment on Malegaon ) जुनी ओळख पुसली गेली असून, मागील अनेक वर्षांपासून इथे शांतता नांदत आहे. मालेगाव हे विकासाच्या वाटेवर असून कोणी कितीही प्रयत्न केला तरी वातावरण खराब होणार नाही, या शब्दात शिवसेना नेते तथा कृषी मंत्री दादा भुसे ( Dada Bhuse news Malegaon ) य‍ांनी मनसेप्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray rally Aurangabad ) यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला.

Dada Bhuse comment on malegaon
मालेगाव विकास दादा भुसे प्रतिक्रिया

नाशिक - राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेनंतर ( Raj Thackeray rally Aurangabad ) राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. भोंग्याविषयी आणि ते उतरवण्याविषयी त्यांच्या अल्टिमेटमवर राजकीय नेते टीक करत आहे. या नंतर कृषी मंत्री दादा भुसे यांची देखील प्रतिक्रिया आली. धार्मिक दंगली ही मालेगावची ( Dada Bhuse comment on Malegaon ) जुनी ओळख पुसली गेली असून, मागील अनेक वर्षांपासून इथे शांतता नांदत आहे. मालेगाव हे विकासाच्या वाटेवर असून कोणी कितीही प्रयत्न केला तरी वातावरण खराब होणार नाही, या शब्दात शिवसेना नेते तथा कृषी मंत्री दादा भुसे ( Dada Bhuse news Malegaon ) य‍ांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला.

हेही वाचा - नाशिकात रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलामुलींची बालगृहात रवानगी

मंदिर मशिदीचा मुद्दा नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. त्याचे पालन करावे लागेल. मालेगावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नच निर्माण होऊ शकत नाही. काही गावांचा इतिहास आहे, पण मालेगावने चांगले वागून नाव लौकिक केले आहे. कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी नाशिकमध्ये आले असता ते बोलत होते. आज राज्यासमोर बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न असे अनेक मुद्दे आहेत. राज्यात प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. पण, आतून काय व बाहेरून काय चालू आहे, हे सर्वाना माहीत आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन करून न्याय हक्काची लढाई केली. 50-60 वर्षे रक्ताचे पाणी करून बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली. आज जे टीका करतात ते बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले. शिवसेना कोणीही संपवू शकत नाही, असा भुसे यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

हेही वाचा - ED opposes Nawab Malik bail : नवाब मलिक यांच्या वैद्यकीय जामीन अर्जाला ईडीचा विरोध

Last Updated : May 2, 2022, 1:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.