महाराष्ट्र

maharashtra

Odisha Train Accident : काँग्रेसचे खासदार अधीर रंजन बालासोरमध्ये अपघातस्थळी पोहोचले..एम्सचे पथक पोहोचणार

By

Published : Jun 3, 2023, 6:39 AM IST

Updated : Jun 4, 2023, 8:55 AM IST

ओडिशामध्ये रेल्वेचा मोठा अपघात
ओडिशामध्ये रेल्वेचा मोठा अपघात

ओडिशामध्ये रेल्वेचा मोठा अपघात झाला आहे. त्यामध्ये किमान 268 लोकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमिवर ओडिशा सरकारने एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे.

भुवनेश्वर (ओडिशा):माजी रेल्वे राज्यमंत्री आणि काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी बालासोरमध्ये अपघातस्थली पोहोचले आहेत. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अधीर रंजन चौधरी आणि काँग्रेसचे प्रभारी ए चेल्ला कुमार यांना ओडिशातील रेल्वे अपघातस्थळी भेट देण्यासाठी नियुक्त केले आहे. एम्स दिल्लीचे वैद्यकीय तज्ञांचे एक पथक गंभीर रूग्णांना उपचार देण्यासाठी पोहोचणार आहेत.

  • ओडिशा रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांचे मृतदेह घेऊन एम्स भुवनेश्वर येथे रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत. 100 मृतदेह एम्स भुवनेश्वरमध्ये ठेवण्यात येणार असल्याचे भुवनेश्वरच्या सहपोलीस आयुक्त प्रतीक गीता सिंह यांनी सांगितले.
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे.
  • केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अपघाताच्या ठिकाणी पूर्ववत स्थिती होण्यासाठी सुरू असलेल्या कामाची पाहणी केली आहे.
  • पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा मागितल्यानंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रेल्वेमंत्री म्हणाले, की आम्हाला पूर्ण पारदर्शकता हवी आहे. ही वेळ राजकारण करण्याची वेळ नाही. परिस्थिती पूर्ववत होईल याची खात्री करण्यावर भर द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालासोर येथे भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे. रुग्णालयातील जखमींची विचारपूस केली आहे. सरकारी वृत्तवाहिनीशी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, की अपघाताची सरकार चौकशी करणार आहे. अपघाताला जबाबदार असणाऱ्यांना सोडण्यात येणार नाही. ज्यांनी अपघातानंतर मदत केली आहे, त्यांचे आभार व्यक्त करतो.
  • दोन्ही पॅसेंजर गाड्यांचे इंजिन चालक आणि गार्ड चमत्कारिकरित्या बचावले आहेत. त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोमंडल एक्स्प्रेसचा लोको पायलट आणि त्याचा सहाय्यक तसेच गार्ड आणि बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसचा गार्ड जखमी आहेत. ही माहिती दक्षिण पूर्व रेल्वेच्या खरगपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक राजेश कुमार यांनी दिली.
  • बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे रुळावरून घसरल्याच्या पार्श्वभूमीवर ओडिशा सरकारने शनिवारी एक दिवसाचा शोक म्हणून दुखवटा घोषित केला आहे. या अपघातात शेवटचे वृत्त हाती आले त्यावेळी किमान 288 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर आणखी इतर 900 जण जखमी झाले आहेत.
  • प्राथमिक तपासात समोर आले आहे की कोरोमंडल एक्स्प्रेस गाडी लूप लाइनमध्ये घुसली. बहानगर बाजार स्थानकाच्या पुढे मुख्य मार्गाऐवजी तिथे उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसचे डबे शेजारच्या रुळावर विखुरलेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसच्या डब्यांवर आदळल्यानंतर उलटले. कोरोमंडल एक्सप्रेस 128 किमी प्रतितास वेगाने धावत होती तर बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस 116 किमी प्रतितास वेगाने धावत होती.
  • एम्स भुवनेश्वरच्या डॉक्टरांचे दोन पथक बालासोर आणि कटकसाठी रवाना करण्यात आले आहे. बचाव मोहिम संपल्याचे रेल्वे मंत्रालयाने ट्विट करून जाहीर केले आहे. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशाला जाणार आहेत. प्रथम ते बालासोर येथील अपघातस्थळाला भेट देतील आणि त्यानंतर कटक येथील रुग्णालयाला भेट देतील. पंतप्रधान मोदी यांनी या अपघातानंतर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच मृतांच्या वारसांच्याबद्दल सहवेदनाही मोदींनी व्यक्त केली आहे. तसेच ते आता घटनास्थळ आणि जखमींचीही भेट घेणार आहेत.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या रेल्वे अपघातात 238 बळी गेले आहेत. सुमारे 650 जखमी प्रवाशांना गोपालपूर, खंतापारा, बालासोर, भद्रक आणि सोरो येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दक्षिण पूर्व रेल्वे विभागाने थोड्याच वेळापूर्वी ही माहिती दिली आहे.

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी घटनास्थळी जाऊन अपघाताची माहिती घेतली. तसेच त्यांनी रुग्णालयात जाऊनही जखमींची विचारपूस केली. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वनही केले आहे.

जखमींची संख्याही मोठी आहे. ९०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तसेच खासजी रुग्णालयांनाही रेल्वे अपघातातील रुग्णांच्यावर उपचार करण्याचे आदेश सरकारने दिल्याची माहिती सचिवांनी दिली आहे. रक्ताचाही मोठ्या प्रमाणात पुरवठा करण्यात येत आहे. कालपासून रक्तदात्यांचीही रीघ या ठिकाणी लागली आहे. मोठ्या प्रमाणात त्यामुळे रक्त जमा झाले आहे.

शुक्रवारी संध्याकाळी हा अपघात झाला. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी शनिवारी एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. आज त्यामुळे राज्यात कोणताही उत्सव साजरा करण्यात येणार नाही. तसेच कोणताही शासकीय उत्सवाचा कार्यक्रम होणार नाही. राज्याच्या I&PR विभागाने अधिकृत प्रकाशनाद्वारे ही घोषणा केली आहे.

रेल्वेने काही हेल्पलाइन नंबरही जारी केलेले आहेत ते खालीलप्रमाणे...

  • इमर्जन्सी कंट्रोल रूम: 6782262286
  • हावड़ा: 033-26382217
  • खड़गपूर: 8972073925, 9332392339
  • बालासोर: 8249591559, 7978418322
  • कोलकाता शालीमार: 9903370746

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घटनास्थळाचा पूर्णपणे आढावा घेतला. तसेच एनडीआरएफने केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. गाड्यांचा अपघात एवढा भीषण होता की तीनही गाड्यांचे डबे एकमेकांच्यावर चढले होते. तसेच त्यातून मार्ग काढत मंत्री वैष्णव अपघातग्रस्त परिसरात सर्वत्र फिरून माहिती घेत होते.

रेल्वे मंत्र्यांनी घटनास्थळाला भेट देऊन विचारपूस केली आहे. या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल असेही त्यांनी सांगितले. तसेच या चौकशीचे आदेश दिल्याची माहितीही वैष्णव यांनी दिली. तसेच त्यांनी मदतकार्य वेगाने सुरू असून, आर्थिक मदतीची घोषणा केल्याचीही माहिती दिली.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी सांगितले की त्यांनी शुक्रवारी रात्री झालेल्या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेबाबत एएनआयशी बोलताना वैष्णव म्हणाले की हा अपघात दुर्दैवी होता आणि या घटनेची माहिती त्यांच्या मंत्रालयापर्यंत पोहोचल्यानंतर लगेचच बचावकार्य सुरू झाले. पॅसेंजर ट्रेनचे डबे रुळावरून घसरण्याचे कारण तपासण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदार डोला सेन यांनी शनिवारी सांगितले की, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी शनिवारी अपघातस्थळी भेट देण्याची शक्यता आहे आणि त्यांनी खडगपूरहून अधिका-यांना भीषण घटनास्थळी सुरू असलेल्या मदतकार्यात हातभार लावण्यासाठी पाठवले आहे. सेन यांनी सांगितले की, अपघात मोठा झाला आहे. त्यामुळे आम्हाला धक्का बसला आहे. आमच्या मुख्यमंत्री (ममता बॅनर्जी) इथे घटनास्थळी भेट देण्यास येऊ शकतात. त्यांनी आमचे अधिकारी, डॉक्टर आणि खडगपूरहून एक ट्रॉमा रुग्णवाहिका पाठवली आहे.

ओडिशाच्या बालासोरमधील बहनगा स्टेशनजवळ मालगाडीला धडकल्यानंतर शालीमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले. रेल्वेचे प्रवक्ते अमिताभ शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

संध्याकाळी 7 च्या सुमारास, शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसचे 10-12 डबे बालेश्वरजवळ रुळावरून घसरले आणि विरुद्धच्या रुळावर पडले. काही वेळाने यशवंतपूरहून हावडाकडे जाणारी दुसरी ट्रेन त्या रुळावरून घसरलेल्या डब्यांना धडकली, परिणामी तिचे 3-4 डबे रुळावरून घसरले. - अमिताभ शर्मा, रेल्वेचे प्रवक्ते

अपघाताची तीव्रता एवढी मोठी होती की तीन गाड्यांच्या अनेक डब्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सकाळी पुन्हा मदतकार्य वेगाने सुरू झाले आहे. यासाठी राज्यातील बचाव पथकांच्या बरोबरच केंद्राने पाठवलेली बचाव पथके कामाला लागली आहेत. त्याचबरोबर हवाई दलाची हेलिकॉप्टरही मतदकार्यासाठी पाचारण करण्यात आली आहेत.

अपघातातील मृतांच्या वारसांना राज्य तसेच केंद्र सरकारमार्फत भरघोत मदत तसेच सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. तसेच लोकांचे जीव वाचवण्यासाठी आसपासच्या रुग्णालयामध्ये जखमींना दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात येत आहेत. या अपघातामुळे दुःखी झाल्याचे भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सांगितले आहे. तसेच अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांबद्दल त्यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच राज्य सरकारमार्फत योग्य ती मदत करण्यात येईल असेही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा-

  1. Sharad Pawar Reaction: ओडिशा रेल्वे अपघाताबाबत शरद पवारांचे मोठे विधान, इतिहासातील 'त्या' घटनेची करून दिली आठवण
  2. PM Modi Visit Balasore: रेल्वे अपघाताची प्रत्येक अँगलने चौकशी केली जाईल-पंतप्रधान नरेंद्र मोदी
  3. Train accident - इस्ट कोस्ट रेल्वेने काही गाड्या केल्या रद्द, काहींचे मार्ग बदलले तर काही गाड्या आंशिक रद्द
Last Updated :Jun 4, 2023, 8:55 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details