ETV Bharat / bharat

PM Modi Visit Balasore:  रेल्वे अपघाताची प्रत्येक अँगलने चौकशी केली जाईल-पंतप्रधान नरेंद्र मोदी

author img

By

Published : Jun 3, 2023, 4:19 PM IST

Updated : Jun 3, 2023, 7:30 PM IST

PM Modi Visit Balasore
पंतप्रधान नरेंद्र मोदी बालासोर भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत शुक्रवारी सकाळी ओडिशाच्या बालासोर येथील अपघाताचा आढावा घेतला. यानंतर पंतप्रधान मोदी भुवनेश्वरला हेलिकॉप्टरने पोहोचले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वे अपघाताबाबत बोलताना

नवी दिल्ली : संपूर्ण जगाला हादरवून टाकणाऱ्या रेल्वे अपघाताची माहिती घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ओडिशातील बालासोर येथे अपघातस्थळी पोहोचले आहेत. दिल्लीहून आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथम भुवनेश्वर विमानतळावर पोहोचले. त्यानंतर हेलिकॉप्टरने बालासोरला रवाना झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि इतर अधिकाऱ्यांकडून परिस्थितीबाबत आढावा घेतला. अपघातस्थळी बचाव मोहिमेचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कटकमधील एससीबी हॉस्पिटलला भेट दिली आहे. या ठिकाणी पंतप्रधान यांनी अपघातामधील जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.

अपघात ही एक वेदनादायक घटना आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी सरकार कोणतीही कमतरता ठेवणार नाही. प्रत्येक दृष्टीकोनातून चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दोषी आढळलेल्यांना कठोर शिक्षा केली जाणार आहे. रेल्वे ट्रॅक पूर्ववत करण्यासाठी काम करण्यात येत आहे. रुग्णालयात जखमी झालेल्या व्यक्तींची भेट घेतली आहे-पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदींनी नवी दिल्लीत एका उच्चस्तरीय बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतला. या उच्चस्तरीय बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कॅबिनेट सचिव, केंद्रीय गृह सचिव आणि एनडीआरएफचे DG व्यतिरिक्त रेल्वे बोर्ड सदस्य आणि इतर अनेक उच्च अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भीषण रेल्वे अपघाताशी संबंधित वस्तुस्थिती आणि त्यानंतरच्या परिस्थितीची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली. दक्षिण पूर्व रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले की बालासोर रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 261 वर पोहोचली आहे, तर सुमारे 900 लोक जखमी झाले आहेत. प्रत्यक्षात या मृत्यूची संख्या वाढत आहे.

रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून स्वतंत्र चौकशी-रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी सकाळी अपघातस्थळी भेट देत सविस्तर उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहे. या अपघाताची रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून स्वतंत्र चौकशी केली जाईल, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. घटनेचे राजकारण नको, आमचे लक्ष बचाव आणि मदत कार्यावर आहे. जिल्हा प्रशासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर या मार्गावरील रेल्वे सेवा पूर्ववत सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

भयंकर अपघाताती जगभरातील देशांनी घेतली नोंद- शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या अपघातात एक मालगाडी आणि दोन पॅसेंजर ट्रेनचा समावेश आहे. या अपघातात कोरोमंडल एक्स्प्रेस आणि SMVT-हावडा सुपर फास्ट एक्स्प्रेसचे 17 डबे रुळावरून घसरले. गेल्या 15 वर्षांतील हा देशातील सर्वात भयानक रेल्वे अपघातांपैकी एक आहे. या अपघातानंतर जगभरातील अनेक देशांनी दु:ख व्यक्त केले आहे. तर भारतात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सविस्तर चौकशी करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा-

  1. Train Tragedy Live Update : ओडिशातील रेल्वे अपघात २६८ जणांचा मृत्यू, पंतप्रधान घटनास्थळी पोहोचले
  2. Major train accidents : भारताला हादरवून सोडणारे मोठे रेल्वे अपघात
  3. Train accident - इस्ट कोस्ट रेल्वेने काही गाड्या केल्या रद्द, काहींचे मार्ग बदलले तर काही गाड्या आंशिक रद्द
Last Updated :Jun 3, 2023, 7:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.