महाराष्ट्र

maharashtra

MLAs Pension in Punjab : आमदाराला एकदाच मिळणार पेन्शन- पंजाबच्या आप सरकारचा निर्णय

By

Published : Mar 25, 2022, 8:31 PM IST

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान ( Punjab CM Sardar Bhagwant Mann ) यांनी शुक्रवारी सांगितले की, पंजाबच्या आमदारांच्या पेन्शन फॉर्म्युलामध्ये बदल करण्यात येणार ( Punjab CM Sardar Bhagwant Mann on Pension ) आहेत. आमदारांना आता फक्त एकच पेन्शन मिळणार आहे. आमदारांच्या पेन्शनवर आतापर्यंत हजारो कोटी रुपये खर्च व्हायचे. आता ते पंजाबच्या जनतेच्या हितासाठी वापरले जाणार आहेत. तसेच आमदारांच्या कुटुंबीयांच्या पेन्शनमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला जात आहे.

मुख्यमंत्री भगवंत मान
मुख्यमंत्री भगवंत मान

चंदीगड- पंजाबच्या आम आदमी सरकारने आमदारांच्या पेन्शनबाबत मोठा निर्णय ( big announcement on MLA Pension ) घेतला आहे. एखादा नेता एकापेक्षा जास्त वेळा आमदार निवडून आला असला तरी, त्याला फक्त एकदाच पेन्शन मिळणार आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले, आतापर्यंत प्रत्येक वेळी कोणी आमदार झाला की पेन्शनची रक्कम जोडली जायची. त्यामुळे अनेक आमदारांना लाखो रुपये पेन्शन मिळत असे. यासोबतच भगवंत मान यांनी राज्यातील बेरोजगारीचा मुद्दाही उपस्थित केला. ते म्हणाले की, पदवी असलेले तरुण जेव्हा नोकरीसाठी जातात तेव्हा त्यांच्यावर लाठीमार केला जातो. आता सरकारकडून तरुणांना नोकऱ्या देण्याची तयारी करण्यात येणार आहे.

हेही वाचा-Sushilkumar Shinde Reaction : 'काश्मीर फाईल्स'प्रमाणे मोदींनी 'गुजरात फाईल्स'ही प्रसिद्ध करावे - सुशीलकुमार शिंदे

पेन्शन कपातीचा निधी जनतेच्या हितासाठी वापरणार

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान ( Punjab CM Sardar Bhagwant Mann ) यांनी शुक्रवारी सांगितले की, पंजाबच्या आमदारांच्या पेन्शन फॉर्म्युलामध्ये बदल करण्यात येणार ( Punjab CM Sardar Bhagwant Mann on Pension ) आहेत. आमदारांना आता फक्त एकच पेन्शन मिळणार आहे. आमदारांच्या पेन्शनवर आतापर्यंत हजारो कोटी रुपये खर्च व्हायचे. आता ते पंजाबच्या जनतेच्या हितासाठी वापरले जाणार आहेत. तसेच आमदारांच्या कुटुंबीयांच्या पेन्शनमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला जात आहे.

हेही वाचा-MH CM in Assembly : ईडीच्या कारवाईवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभेत आक्रमक, मलिकांचा राजीनामा न घेण्यावरही ठाम

आमदारांच्या पेन्शनमुळे तिजोरीवर कोट्यवधी रुपयांचा बोजा-

पुढे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले, पंजाबची तिजोरी आता नेत्यांसाठी नव्हे तर जनतेसाठी वापरली जाणार आहे. सीएम मान म्हणाले की, तुम्हाला आश्चर्य वाटेल की असे अनेक आमदार आहेत जे तीन-चार वेळा निवडणूक जिंकले आहेत. त्यानंतर हरले आहेत. पाच ते सहा वेळा जिंकणाऱ्यांना लाखो रुपयांची पेन्शन दर महिन्याला मिळते. कोणाला 3.50 लाख तर कोणाला 4.50 लाख रुपये दर महिन्याला पेन्शन मिळते. कुणाला साडेपाच लाख रुपयेही मिळाले आहेत. त्याचा तिजोरीवर कोट्यवधी रुपयांचा बोजा पडतो.

हेही वाचा-MH Assembly Budget Session : 'राज्यात छुपी आणीबाणी लागू करण्याचा प्रयत्न', नाव न घेता मुख्यमंत्र्यांचे विरोधकांवर टीकास्त्र

काँग्रेस आणि अकाली दलाच्या दिग्गज नेत्यांना धक्का

येथे आमदार असलेल्या खासदारांचे पेन्शनही अनेकजण घेत आहेत. त्यामुळे सरकारने पेन्शन धोरणात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब सरकारच्या या निर्णयामुळे काँग्रेस आणि अकाली दलाच्या दिग्गज नेत्यांना धक्का बसला आहे. 2022 पूर्वी या दोन्ही पक्षांमध्ये असे अनेक नेते होते, जे आमदार निवडून येत राहिले. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या या निर्णयाला काँग्रेसचे माजी आमदार कुलदीप वैद यांनी विरोध केला होता.

काँग्रेसच्या माजी आमदाराचा पेन्शन कपातीला विरोध

काँग्रेसचे माजी आमदार कुलदीप वैद म्हणाले, की आमदारांना पेन्शन मिळाली नाही तर ते भ्रष्ट होतील. लुधियानाचे माजी आमदार कुलदीप वैद म्हणाले की, आम आदमी पक्ष फक्त जनतेला मूर्ख बनवत आहे. ते म्हणाले की, एका आमदाराला एकच पेन्शन मिळते. महागाई वाढली की त्यांचा भत्ता वाढतो. ते पुढे म्हणाले की, भगवंत मान यांच्या निर्णयाशी ते सहमत नाहीत. कारण माजी आमदारांनाही मुलांचा सांभाळ करावा लागतो. त्याचबरोबर कामगार, सामान्य लोक आणि त्यांच्या कार्यालयांनाही खर्च करावा लागतो, त्यामुळे त्यांच्या पेन्शनमधील कपात योग्य नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details