ETV Bharat / city

Sushilkumar Shinde Reaction : 'काश्मीर फाईल्स'प्रमाणे मोदींनी 'गुजरात फाईल्स'ही प्रसिद्ध करावे - सुशीलकुमार शिंदे

author img

By

Published : Mar 25, 2022, 7:52 PM IST

Updated : Mar 25, 2022, 8:27 PM IST

Sushilkumar Shinde
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे

हिजाब (Hijab) आणि काश्मीर फाईल्स (The Kashmir Files) या मुद्द्यांचा राजसत्तेवर असणाऱ्यांनी प्रपोगंडा केला आहे. त्यापेक्षा ‘गुजरात फाईल्स’ही (Gujarat Files) एकदा वाचून बघा व तोही मोदींनी (PM Modi) प्रसिद्ध करावा, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी दिली आहे. ते आज सोलापुरात बोलत होते.

सोलापूर - हिजाब (Hijab) आणि काश्मीर फाईल्स (The Kashmir Files) या मुद्द्यांचा राजसत्तेवर असणाऱ्यांनी प्रपोगंडा केला आहे. त्यापेक्षा ‘गुजरात फाईल्स’ही (Gujarat Files) एकदा वाचून बघा व तोपण मोदींनी (PM Modi) प्रसिद्ध करावा, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी दिली आहे. देशात हिजाब आणि काश्मीर फाईल्सवरून जोरदार राजकारण सुरू आहे. यासर्व विषयांवर सुशीलकुमार शिंदे यांनी आज सोलापुरात भाष्य केले आहे.

सुशीलकुमार शिंदे - ज्येष्ठ नेते, काँग्रेस

गुजरात फाईल्स प्रसिद्ध करावी : काश्मीर फाईल्सप्रमाणे पंतप्रधानांनी गुजरात फाईल्सचीही प्रसिद्धी करावी, असे मत सुशीलकुमार शिंदे यांनी मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. जसा काश्मीर फाईल्स काढला तसा राणा आय्युब लिखित गुजरात फाईल्सबाबत विचार व्हावा, त्याची प्रसिद्धी पंतप्रधानांनी करावी. दोन्ही बाजूने बॅलंसिंग करावे, अशी अपेक्षा सुशीलकुमार शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा होणे गरजेचे : देशात सध्या महत्वाचे मुद्दे, जगण्या मरण्याचे प्रश्न बाजूला होत आहेत. जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी हिजाब, काश्मीर फाईल्स, गुजरात फाईल्स हे मुद्दे जास्त चर्चिले जात आहेत, असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले. भाजपकडून काश्मीर फाईल्स चित्रपटाला पाठिंबा दिला जात आहे, तर विरोधकांकडून त्याचा प्रतिवाद केला जात आहे. 'हिजाब’वरूनही देशाच्या काही भागात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. कर्नाटकात तर काही दिवस शाळा-महाविद्यालये बंद ठेवावी लागली होती. या सर्व पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विधानाला महत्व आले आहे.

Last Updated :Mar 25, 2022, 8:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.