ETV Bharat / city

MH Assembly Budget Session : 'राज्यात छुपी आणीबाणी लागू करण्याचा प्रयत्न', नाव न घेता मुख्यमंत्र्यांचे विरोधकांवर टीकास्त्र

author img

By

Published : Mar 25, 2022, 7:45 PM IST

Updated : Mar 25, 2022, 7:54 PM IST

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत विरोधकांवर जोरदार ( uddhav Thackeray Critisized opposition ) हल्ला चढवला. विरोधकांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेत खोटे राजकारण करून कुणाला छळू नका, हिम्मत असेल तर समोर येऊन लढा, असे आव्हानच दिले. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रत्यक्ष कामकाजात सहभाग न घेणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ( Uddhav Thackeray Speech In Assembly ) आज अर्थसंकल्पाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात हजेरी लावली.

MH Assembly Budget Session
MH Assembly Budget Session

मुंबई - अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत विरोधकांवर जोरदार ( uddhav Thackeray Critisized opposition ) हल्ला चढवला. विरोधकांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेत खोटे राजकारण करून कुणाला छळू नका, हिम्मत असेल तर समोर येऊन लढा, असे आव्हानच दिले. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रत्यक्ष कामकाजात सहभाग न घेणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ( Uddhav Thackeray Speech In Assembly ) आज अर्थसंकल्पाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात हजेरी लावली. अंतिम आठवडा प्रस्तावच्या उत्तराच्या निमित्ताने त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. विरोधकांनी केलेल्या प्रत्येक आरोपाला खोडून काढण्याचा प्रयत्न करताना त्यांनी कुणाच्याही घरापर्यंत येऊन त्रास देऊ नका, असे आव्हान विरोधकांना दिले.

महाराष्ट्रात सर्वात कमी दारूची दुकाने - आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राचा उल्लेख मद्यराष्ट्र असा केला होता. याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, 'सुधीर भाऊ तुम्ही हे राज्य मद्यपी राज्य आहे असे म्हणालात. देशात १ लाख लोसंख्येच्या मागे सर्वात कमी दारूची दुकाने महाराष्ट्रात आहेत. तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करत आहात हे योग्य नाही.'

'काही लोकांचा जीव मुंबईत अडकतो' - रावणाचा जीव हा बेंबीत होता. तसा काही जणांचा जीव मुंबईत आहे. असे सांगताना मुंबई महानगर पालिकेने केलेल्या कामांबाबत त्यांनी माहिती दिली. मुंबईत पब्लिक स्कूल चालू केले. महापालिकेच्या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून शाळेच्या बाहेर रांगा लागत आहेत. ५०० चौरस फुटाच्या घराना मालमत्तेत पूर्ण सूट दिली आहे. कर्करोगावर उपचार करणारी देशात पहिली महानगर पालिका मुंबई आहे. कोविडमध्ये ज्यांना द्वेषाची कावीळ झाली, त्यांना काहीच करू शकत नाही. असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. त्यांनी सुद्धा जा मुंबईची काळातल्या कामगिरीबाबत प्रशंसा केली. केंद्राने नियमावली बनवली. जीव वाचवणे ही प्राथमिकता होती. मुंबईत एकही काम विना टेंडर केले गेले नसल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

'ईडी तुमची घरगडी आहे का' - ईडीच्या माध्यमातून सुरू असलेल्या कारवायांचा खरपूस समाचार घेताना मुख्यमंत्र्यांनी ईडी तुमची घरगडी आहे का, असा सवाल केला. इतकी वर्ष मंत्री आमदार म्हणून निवडून येतात. तेव्हा केंद्रीय यंत्रणा झोपल्या होत्या का, जर ते दोषी असते, तर तेव्हा कारवाई का केली नाही. केंद्रीय यंत्रणा इतक्या बोगस झाल्या आहेत का, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

'कुटुंबाची बदनामी करणे म्हणजे नीचपणाचा कळस'- एखाद्याच्या कुटुंबाची बदनामी करणे हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे. हिम्मत असेल, तर समोर येऊन लढा शिखंडी सारखे लढू नका. तुम्हाला अटकच करायची असेल तर मला अटकेत टाका, पण शिवसैनिकांना छळू नका. काही लोक यंत्रणेचे दलाल आहेत की प्रवक्ते हेच समजत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपली उद्विग्नता व्यक्त केली. इंदिरा गांधींनी राज्य देशभरात आणीबाणी लागू केली होती. पण ती सांगून केली होती, छोटी आणीबाणी लागू केली नव्हती. काही लोक राज्यात छुपी आणीबाणी लागू करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

हेही वाचा - Yogi Adityanath Oath : योगी आदित्यनाथ यांच्यासह 52 मंत्र्यांनी घेतली शपथ; वाचा यादी

Last Updated : Mar 25, 2022, 7:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.