महाराष्ट्र

maharashtra

'सारा पंजाब सिद्धू नाल', अमृतसरमध्ये नवज्योत सिद्धू यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी

By

Published : Jun 17, 2021, 9:41 AM IST

मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि माजी कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात पोस्टर वॉर सुरू झाला आहे. नुकतेच पतियाळासह अनेक शहरांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ पोस्टर्स आणि होर्डिंग्ज दिसली होती. आता काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्या समर्थनार्थ होर्डिंग्ज अमृतसरमध्ये पाहायला मिळाले आहेत.

अमृतसरमध्ये नवज्योत सिद्धू यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
अमृतसरमध्ये नवज्योत सिद्धू यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी

चंदीगढ - पंजाब काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. या परिस्थितीत मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि माजी कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात पोस्टर वॉर सुरू झाला आहे. नुकतेच पतियाळासह अनेक शहरांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ पोस्टर्स आणि होर्डिंग्ज दिसली होती. आता काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्या समर्थनार्थ होर्डिंग्ज अमृतसरमध्ये पाहायला मिळाले आहेत.

नवजोतसिंग सिद्धूच्या समर्थनार्थ पोस्टर्स अमृतसरमध्ये लागली आहेत. सर्व पंजाब सिद्धू यांच्यासमवेत असे पोस्टरमध्ये लिहलेले आहे. यावेळी, दोन्ही नेत्यांमध्ये स्वत: ला अधिक चांगले दाखवण्याची स्पर्धा सुरू आहे. नागरिकांचे समर्थन असल्याचे पोस्टरच्या माध्यमातून सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अमृतसरमधील चौरस, बूथ, रेल्वे स्थानक, ओव्हर ब्रिजवर सिद्धूच्या समर्थनार्थ अनेक ठिकाणी होर्डिंग्ज आढळली आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसमध्ये वाद सुरू होता. पक्षाच्या हायकमांडलादेखील दोन्ही नेत्यांमध्ये हस्तक्षेप करावा लागत आहे. राजकीय पेचप्रसंग आणि वाद काही संपण्याचे नाव घेत नसल्याचे दिसत आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांनी उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर फेटाळून लावली आहे. तर सिद्धू यांनी कॅप्टन अमरिंदर यांच्यासोबत काम करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.

सोनिया गांधींचा हस्तक्षेप -

पंजाब काँग्रेस दोन गटांमध्ये विभागली गेली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आता थेट पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी हस्तक्षेप केला आहे. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांना 20 जून रोजी दिल्लीत बोलावल्याची माहिती आहे. पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या कार्यशैलीबद्दल अनेक आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. कॅप्टनदेखील आपल्या पातळीवर वाद मिटविण्याचा आणि संतप्त नेत्यांच्या तक्रारी दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details