महाराष्ट्र

maharashtra

छत्रपती शिवरायांना का म्हटले जाते 'भारतीय आरमाराचे जनक'? जाणून घ्या तुम्हाला क्वचितच माहित असलेल्या गोष्टी

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 4, 2023, 10:11 AM IST

Updated : Dec 4, 2023, 9:21 PM IST

'भारतीय नौदल दिना'निमित्त सिंधुदुर्ग किल्ल्यावर नौदलाकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग ही 'भारतीय आरमाराचे जनक' मानल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची सागरी राजधानी होती. तर जाणून घेऊ छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार क्षेत्रातील योगदान!

छत्रपती शिवरायांना का म्हटले जाते भारतीय नौदलाचे जन
father of indian navy Chhatrapati Shivaji Maharaj

माहिती देताना पांडुरंग बलकवडे

हैदराबाद :भारतीय नौदलाकडून सिंधुदुर्ग किल्ल्यावर जहाजे आणि विमानांद्वारे 'नौदल दिना'निमित्त सामर्थ्याचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात मिग 29K आणि LCA नौदलाचा समावेश असलेल्या 40 विमानांसह 20 युद्धनौका सहभाग होणार आहेत. तसेच भारतीय नौदलाच्या मरीन कमांडोज (मार्कोस) द्वारे समुद्रकिनाऱ्यावरील शोध आणि हल्ला याचे प्रात्याक्षिक दाखविण्यात येणार आहे. या प्रकारचा देशातील पहिलाच कार्यक्रम नौदलाकडून करण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1660 मध्ये सिंधुदुर्ग किल्ला बांधला. आजही हा किल्ला चांगल्या स्थितीत असून भारताच्या समृद्ध सागरी इतिहासाचा साक्षीदार आहे. एवढंच नव्हे तर नौदलाकडून प्रात्यक्षिक करण्यासाठी लागणाऱ्या क्षमतादेखील किल्ल्यात आहे. त्यामुळेच नौदलाकडून या किल्ल्यावर कार्यक्रम घेण्यात येत आहेत. कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहेत. यानिमित्त 'भारतीय आरमाराचे जनक' म्हणून ओळख असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्याबाबत माहिती घेऊ.

  1. छत्रपती शिवाजी महाराजांना 'भारतीय आरमाराचे जनक' असे म्हटले जाते.
  2. मराठा साम्राज्यात सशस्त्र मावळे असलेली नौदल (आरमार) ही स्वतंत्र शाखा होती.
  3. छत्रपती शिवाजी महाराजांनी मायनाक भंडारी व इतर दर्यासारंगांच्या मदतीनं कल्याण येथे सन 1657 साली देशातील पहिले मोठे आरमार उभे केले. त्यामुळे इंग्रज, फ्रेंच अशा परकीय सत्तांना सागरी किनारी भागाकडून भारतात आक्रमण करता आले नाही.
  4. देशात 4 डिसेंबरला 'नौदल दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. तर महाराष्ट्रात २४ ऑक्टोबर हा 'आरमार दिन' म्हणून साजरा केला जातो. छत्रपती शिवरायांनी 24 ऑक्टोबर 1657 दिवशी भारतातील पहिले जहाज निर्माण करुन सागरी सुरक्षेची मुहुर्तमेढ रोवल्यानं 'आरमार दिन' साजरा करण्यात येतो.
  5. सिंधुदुर्ग हे शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख केंद्र होते.
  6. सिंधुदुर्ग जिल्ह्याची उभारणी ही सिद्दी, इंग्रज, पोर्तुगीज आदी परकीय सत्तांना पायबंद घालण्यासाठी करण्यात आली. सुरतच्या लुटीमधून आलेल्या संपत्तीचा वापर करून जलदुर्गाची उभारणी करण्यात आली.
  7. छत्रपती शिवाजी महाराज यांनी कान्होजी आंग्रे यांची आरमार प्रमुखपदी नेमणुक केली. त्याकाळी आरमाराच्या प्रमुखाला 'सरखेल' या उपाधीने ओळखलं जात असे.
  8. भारतीय नौदलानं कान्होजी आंग्रे यांच्या स्मरणार्थ आणि सन्मानार्थ वेस्टर्न नेव्हल कमांडला आयएनएस आंग्रे असं नाव दिलंय.
  9. भारतीय टपाल सेवेनं मराठा ताफ्यातील पाल आणि गुरब यांच्या स्मरणार्थ तिकिट जारी केले.
  10. इतिहासातील नोंदीनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारमध्ये जहाजांची संख्या चारशे होती. कोकणात व ठाणे जिल्ह्यात जहाज बांधणीसाठी लागणारे लाकूड वापरून ही जहाज बांधणी करण्यात आली होती.
  11. इतिहातील नोंदीनुसार, स्वराज्यातील नऊ बंदरांमधून मोचा, कोगो, बसरा, मक्का, इराण, मस्कत इत्यादी ठिकाणी मोठा व्यापार होत असे. सागरी बंदराचा सुरक्षेबरोबर व्यापारासाठी वापर करून छत्रपती शिवरायांनी दूरदृष्टीबरोबरच आर्थिक चातुर्याने स्वराज्याचा लाभ करून दिला.
  12. इंग्रज आणि पोर्तुगीज आरमाराला अखेरपर्यंत कान्होजी आंग्रे यांना पराभूत करणे अशक्य ठरले. मराठा आरमार अजिंक्य राहिल्यानं ब्रिटिशांनी कोकण किनारपट्टीवर शांततेचा तह केला.
  13. शिवरायांच्या आरमारात सुमारे पाच हजार सैनिक होते. त्यामुळे मराठा साम्राज्यानं समुद्रावर दरारा निर्माण करत शत्रुंना धडकी भरावी अशी कामगिरी केली होती.

हेही वाचा-

  1. पंतप्रधान मोदी आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर; 'या' कार्यक्रमांना राहणार उपस्थित
Last Updated :Dec 4, 2023, 9:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details