महाराष्ट्र

maharashtra

Today's Top News in Marathi : अभिनेते नाना पाटेकर यांचा आज वाढदिवस; टॉप न्यूज, वाचा एका क्लिकवर

By

Published : Jan 1, 2022, 6:24 AM IST

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे जाणून घ्या. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

Today's Top News in Marathi
टॉप न्यूज, वाचा एका क्लिकवर

  • आज दिवसभरात -
  1. कोरेगाव भीमा शौर्य दिन : विजयस्तंभाला अभिवादनासाठी अनेक अनुयायी उपस्थित; उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धनंजय मुंडे राहणार उपस्थित
  2. अभिनेते नाना पाटेकर यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1951मध्ये झाला आहे.
  3. केंद्रीय शिक्षणमंत्री आज 'पढे भारत' अभियानाला सुरुवात करणार. 100 दिवसांचे हे अभियान राहणार आहे.
  4. CLAT 2022:प्रवेशासाठीआजपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी सुरुवात. consortiumofnlus.ac.inया संकेतस्थळावर जाऊन उमेदवार अर्ज करू शकतात.
  5. पद्मविभूषण शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1943मध्ये झाला आहे.


काल दिवसभरात -

  1. मुंबई -नव वर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईवर खलिस्तानी संघटना दहशतवादी हल्ले ( Khalistani Terrorist Organizations Attacks ) करू शकतात, अशी माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना ( Central Intelligence Agency ) मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस ( Mumbai Police ) सतर्क झाले असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई पोलिसांकडून ठिक ठिकाणी रेल्वे स्थानकांवर चौकशी ( Inquiries at Railway Stations ) करण्यात येत आहे. रेल्वेस्थानकावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. सविस्तर वाचा -
  2. मुंबई -सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी ( Mumbai New Year 2022 Celebration ) मुंबईतील मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी आणि गेटवे ऑफ इंडिया ( Marine Drive, Girgaon Chowpatty, Juhu Chowpatty and Gateway of India ) या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक आणि पर्यटक येत असतात. मात्र यंदा वाढत्या कोरोनाच्या ( Corona ) पार्श्वभूमीवर या पर्यटनस्थळी सर्वसामान्य नागरिकांना आणि पर्यटकांना संध्याकाळी ५ ते पहाटे ५ पर्यंत या स्थळांवर जाण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. हे निर्बंध १५ जानेवारीपर्यंत हे असणार आहे.सविस्तर वाचा -
  3. ठाणे -शुक्रवारीवर्ष संपत असतांना ‘लीप सेकंद‘ धरला गेला नसल्याने नवीन वर्ष सन २०२२ चा प्रारंभ आज (शुक्रवारी) रात्री ठीक १२ वाजता होणार आहे. हे नववर्ष काम करणाऱ्यांसाठी महत्वाचे असणार आहे. सन २०२२मध्ये एकूण मिळणाऱ्या २४ सुट्ट्यांपैकी ६ सुट्ट्या रविवारी येत आहेत. तसेच येणारे वर्ष हे लीपवर्ष नसल्याने वर्षात एकूण ३६५ दिवस काम करण्याची संधी मिळणार असल्याचे ज्येष्ठ पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. सविस्तर वाचा -
  4. शिर्डी (अहमदनगर) - साईबाबांची सगळ्यांवर कृपा बरसो आणि कोरोनाचे संकट दुर व्हावे, यासाठी साईबाबांच्या चरणी प्रार्थना केल्याचे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले. आत्मनिर्भर मध्यप्रदेशसाठी जनतेचा सहयोग हवा आहे. त्यांच्या सहयोगाशिवाय काही होणार नाही. आत्मनिर्भर भारत बरोबरीने आत्मनिर्भर मध्यप्रदेश बनविण्याचा रोड मॅप आम्ही तयार केला आहे. जनतेच्या सहकार्याने तो पुर्ण करत कोरोनालाही हरवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ( Shivraj Singh Chouhan in Shirdi )दरवर्षी सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाची सुरुवात साईबाबांच्या दर्शनाने करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासुन शिवराज सिंह चौहान सहपरिवार साई दरबारी आवर्जून हजेरी लावत असतात. शुक्रवारीही नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला शिवराज सिंह चौहान सह परिवार शिर्डीत दाखल झाले. सविस्तर वाचा -
  5. मुंबई -सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक संतोष परब मारहाण प्रकरणावरून अटीतटीची झाली होती. गुरुवारी झालेल्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी घोषित झाला. यात भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. या निवडणुकीबद्दल बोलताना, "सरकारी यंत्रणेचा गैरवापर, पोलिसी दडपशाही, सत्तेची अरेरावी हे सर्व झुगारून मतदारांनी लोकशाही निवडली आहे," असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी व्यक्त केले. फडणवीस यांनी ट्विट करत आपले मत व्यक्त केले. ( Devendra Fadnavis on Sindhudurg District Bank Result 2021 ) सविस्तर वाचा -

ABOUT THE AUTHOR

...view details