ETV Bharat / bharat

01 January Rashi Bhavishya : 'या' राशीवाल्यांना आज सकारात्मक बातमी मिळेल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

author img

By

Published : Jan 1, 2022, 12:02 AM IST

कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य

Rashi Bhavishya
Rashi Bhavishya

मेष - आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज आपण सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल. गूढ रहस्यमय विद्येचे आपणास आकर्षण राहील. आपणाला एखादी अलौकिक अनुभूती होईल. वाणीवर संयम ठेवून अनेक गैरसमज आपण टाळू शकाल. अचानक धन लाभ होईल. हितशत्रूपासून जपून राहा. नवीन कार्यारंभ करू नका. स्त्री व पाण्यापासून जपून राहावे लागेल.

वृषभ - आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आज संसारात व दांपत्य जीवनात सुख - शांती अनुभवाल. कुटुंबीय व निकटचे मित्र यांच्या सह उत्तम भोजनाचा आस्वाद घ्याल. एखाद्या जवळच्या प्रवासाचे नियोजन कराल. प्रकृती उत्तम राहील. धनलाभ होईल. दूर राहणार्‍या स्नेह्यांकडून येणारी बातमी आपणास खुश करील. भागीदारीत लाभ व सार्वजनिक जीवनात मान - सन्मान मिळतील.

मिथुन - आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आजचा दिवस अपूर्ण कामे पूर्णत्वास जाण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. कुटुंबात हर्षोल्हासाचे वातावरण राहील. स्वास्थ्य उत्तम राहील. कामात यश व कीर्ती लाभेल. इतरांशी बोलताना आपल्या रागावर नियंत्रण ठेवून मितभाषी राहिल्यास मतभेदाचे प्रसंग उदभवणार नाहीत. धनप्राप्ती होईल. आवश्यक तेवढाच खर्च कराल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. नोकरीत लाभ होतील.

कर्क - आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आजचा दिवस शांततेत घालवावा लागेल. शारीरिक व मानसिक दृष्टया उद्विग्नता राहील. पोटदुखीचे विकार बळावतील. अचानक पैसा खर्च होईल. प्रेमीजनांत वाद - विवाद होऊन रुसवे- फुगवे होतील. भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण आपणास अडचणीत टाकेल. नवीन कार्यारंभ अथवा प्रवास न करणे हितावह राहील.

सिंह - आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आज आपणास मानसिक अस्वस्थता जाणवेल. कुटुंबीयांशी मतभेद होतील. जमीन, घर अथवा वाहनाची खरेदी किंवा खरेदीपत्र करण्यास आजचा दिवस अनुकूल नाही. नकारात्मक विचारांमुळे निराशा येईल. जलाशय धोकादायक ठरू शकतात. नोकरीत स्त्री वर्गा पासून जपून राहा.

कन्या - आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आज विचार न करता कोणतेही साहस करू नका. भावनात्मक संबंध प्रस्थापित होतील. मित्र व स्नेह्यांशी संवाद साधू शकाल. गूढ व रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील. एखाद्या विषयात प्रावीण्य प्राप्त होईल. विरोधक व प्रतिस्पर्धी ह्यांचा जोमाने प्रतिकार करावा लागेल.

तूळ - आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आज आपली मानसिकता नकारात्मक राहील. रागाच्या भरात वाणीवर संयम न राहिल्याने कुटुंबीयांशी मतभेद होतील. वायफळ खर्च होईल. आरोग्य बिघडेल. मनात ग्लानी निर्माण होईल. अवैध प्रवृत्तीत सहभागी होऊ नये. विद्यार्थ्यांना अभ्यासात व्यत्यय येतील.

वृश्चिक - आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक प्रसन्नता वाटेल. कुटुंबियांच्या सहवासात आजचा दिवस आनंदात जाईल. मित्र व स्नेही यांच्याकडून भेटवस्तू मिळतील. प्रिय व्यक्तीशी सुसंवाद साधण्यात यश मिळेल. मंगल कार्याला उपस्थिती लावाल. धनलाभ व प्रवास संभवतात. दांपत्य जीवनात प्रसन्नता अनुभवाल.

धनू - आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज आपल्या रागामुळे कुटुंबीय व इतर लोकांशी आपले संबंध दुरावतील. आपले बोलणे व वागणे हे एखाद्या वादाचे कारण ठरेल. एखादी दुर्घटना संभवते. आजारावर खर्च होईल. न्यायालयीन कामकाजात दक्षतेने पाऊल उचलावे. निरुपयोगी कामांवर आपली शक्ती खर्च होईल.

मकर - आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आजचा दिवस प्रत्येक गोष्टीत लाभदायक आहे. मित्रांची भेट होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास संस्मरणीय होईल. विवाहोत्सुक व्यक्तींच्या समस्या किरकोळ प्रयत्नांनी सुटतील. व्यापार्‍यांची व्यापारात व नोकरदारांची नोकरीत प्राप्ती वाढेल. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. नव्या वस्तूंची खरेदी होईल.

कुंभ - आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आज प्रत्येक काम सरळपणे होऊन त्यात यश सुद्धा मिळेल. नोकरी - व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. सरकारी कामे निर्विघ्नपणे पूर्ण होतील. वरिष्ठ अधिकारी सहकार्य करतील. प्रकृती उत्तम राहील. मानसिक उत्साह जाणवेल. बढती व धनप्राप्ती संभवते. कौटुंबिक जीवन आनंदी राहून आपली मान - प्रतिष्ठा वाढेल.

मीन - आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आजच्या दिवसाची सुरवात भीती व उद्विग्नता ह्याने होईल. शरीरास आळस व थकवा जाणवेल. कोणतेच काम पूर्ण न झाल्याने नैराश्य येईल. नशिबाची साथ मिळणार नाही. कार्यालयात वरिष्ठांशी मतभेद होतील. संतती हे आजच्या चिंतेचे प्रमुख कारण राहील. अकारण पैसा खर्च होईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.