ETV Bharat / city

Mumbai On High Alert : मुंबईत दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेमुळे रेल्वे स्थानकांवर पोलिसांकडून चौकशी

author img

By

Published : Dec 31, 2021, 10:32 PM IST

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर खलिस्तानी संघटनेकडून मुंबई दहशतवादी ( Khalistani Terrorist Organizations Attacks ) हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणेने ( Inquiries at Railway Stations ) वर्तवली आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या उद्याच्या (शनिवारी) साप्ताहिक आणि इतर सर्व सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी 3 हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.

चौकशी करतांना पोलीस
चौकशी करतांना पोलीस

मुंबई - नव वर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईवर खलिस्तानी संघटना दहशतवादी हल्ले ( Khalistani Terrorist Organizations Attacks ) करू शकतात, अशी माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना ( Central Intelligence Agency ) मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस ( Mumbai Police ) सतर्क झाले असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई पोलिसांकडून ठिक ठिकाणी रेल्वे स्थानकांवर चौकशी ( Inquiries at Railway Stations ) करण्यात येत आहे. रेल्वेस्थानकावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे.


नववर्षाच्या पार्श्वभूमीवर खलिस्तानी संघटनेकडून मुंबई दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणेने वर्तवली आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या उद्याच्या (शनिवारी) साप्ताहिक आणि इतर सर्व सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी 3 हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. मुंबईतील चर्चगेट, सीएसटी, मुंबई सेंट्रल, बांद्रा, अंधेरी यासह इतर स्थानकांवर देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. प्रवासाची तपासणी केली जात आहे. प्रत्यक्ष तपासणी सोबतच श्वान पथकाचा साहाय्याने मुंबई पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात नववर्षाच्या स्वागताकरीता लोक बाहेर येत असतात, त्यांच्या सुरक्षित ते करिता मुंबईतील सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेले आहे.

हेही वाचा - Goa New Year 2022 Celebration : गोव्यात नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो पर्यटक गोव्यात दाखल; कोरोनाच्या संसर्गात वाढ

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.