महाराष्ट्र

maharashtra

Double murder in Meerut दुहेरी हत्याकांडाने मेरठ हादरले, बँक मॅनेजरची गरोदर पत्नी, मुलाची झाली हत्या

By

Published : Aug 30, 2022, 2:01 PM IST

मेरठमधील दुहेरी हत्याकांडाने Double murder in Meerut जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा एकदा अडचणीत आणली आहे. बँक मॅनेजरची गरोदर पत्नी आणि तिच्या ५ वर्षाच्या मुलाची हत्या Killing of pregnant mother and child करून मारेकऱ्यांनी घराच्या गेटला कुलूप लावले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

National news
National news

मेरठ जिल्ह्यातील हस्तिनापूर येथे सोमवारी दुहेरी हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे.रामलीला ग्राऊंड कॉलनीत एका बँक मॅनेजरची गरोदर पत्नी आणि तिच्या मुलाची दरोडेखोरांनी गळा आवळून हत्या Killing of pregnant mother and child केली. दोघांचेही मृतदेह घराच्या आतील डबल बेडवर आढळून आले. ही घटना घडल्यानंतर चोरट्यांनी मुख्य गेटला कुलूप लावून पळ काढला. यानंतर रात्री उशिरा घराचे कुलूप तोडून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी एसएसपी आणि एसपी यांच्यासह पोलिस अधिकारी पथकासह उपस्थित होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हस्तिनापूरमधील रामलीला ग्राउंड कॉलनीत राहणारा संदीप कुमार हा बिजनौरमधील पीएनबीमध्ये मॅनेजर आहे. सोमवारी सकाळी संदीप बँकेत गेला. त्यांची पत्नी शिखा (३४) आणि ५ वर्षाचा मुलगा रुद्रांश घरी होते. रात्री आठच्या सुमारास संदीप घरी परतला तेव्हा मुख्य गेटला कुलूप होते. पत्नीच्या फोनवर फोन केला, पण फोन उचलला गेला नाही. संदीप त्याच्या ओळखीच्या घरी गेला. रात्री दहा वाजेपर्यंत शिखाचा मोबाईल उचलला गेला नाही व कोणतीही माहिती न मिळाल्याने संदीपने कुटुंबीयांसह घराचे कुलूप तोडले. त्यांनी आत पाहिले तर सगळ्यांचा थरकाप उडाला. आतील बेडवर एका खोलीत शिखाचा मृतदेह पडलेला होता, तर रुद्रांशचा मृतदेह दुसऱ्या खोलीत आढळून आला. घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते.

नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिलीयानंतर एसएसपी रोहित सिंह सजवान आणि एसपी देहत केशव कुमार घटनास्थळी पोहोचले. दरोड्यानंतर महिला आणि मुलाची हत्या करण्यात आल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. चोरट्यांनी घरातून स्कूटीही नेली आणि मुख्य गेटला कुलूप लावले. एसपी देहत केशव कुमार यांनी सांगितले की, महिलेच्या मोबाईलमधून काही व्हॉट्सअॅप चॅट डिलीट करण्यात आले आहेत. अनेक पुरावे मिळाले आहेत. त्याआधारे तपास सुरू आहे. मारेकरी ओळखीचा असल्याचा संशय आहे. लवकरच या संपूर्ण खून प्रकरणाचा उलगडा होणार आहे.

हेही वाचाsuprime court on babri सर्वोच्च न्यायालयाने बाबरी मशिदीसंदर्भातील संपूर्ण कार्यवाही केली बंद

ABOUT THE AUTHOR

...view details