महाराष्ट्र

maharashtra

उत्तराखंड सरकारला तरुणांची राज्यात घेऊन जाण्याची मागणी

By

Published : May 17, 2020, 7:17 PM IST

देशभर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे उत्तराखंड राज्यातील सहा तरुण पालघर जिल्ह्यात अडकून पडले आहे. तरुणांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून उत्तराखंड सरकारला घरी घेऊन जाण्याची मागणी केली आहे.

Trivendra Singh Rawat
त्रिवेंद्र सिंह रावत

धनोल्टी (उत्तराखंड) -देशभर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे उत्तराखंड राज्यातील सहा तरुण पालघर जिल्ह्यात अडकून पडले आहे. तरुणांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून उत्तराखंड सरकारला घरी घेऊन जाण्याची मागणी केली आहे. आम्ही एका हॉटेलमध्ये काम करत होतो. तेथील काम बंद झाल्यामुळे आमच्याकडे खर्चायला आणि खाण्यासाठी विकत घ्यायला सुद्धा पैसे नसल्याचे ते तरुण सांगत आहेत.

उत्तराखंडला सरकारला सहा तरुणांची मायदेशी घेऊन जाण्याची मागणी

तरुणांनी हा व्हिडिओ विद्यार्थी नेता राजमोहन सिंह यांना पाठवला होता. यात त्यांनी आम्ही पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे घरी जाण्याची परवानगी मागितली होती. तसेच या तरुणांनी उत्तराखंड सरकारच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क केला आहे. मात्र, त्यांना अजूनही प्रतिसाद मिळाला नाही. राजमोहन सिंह यांनी उत्तराखंड सरकारशी बोलून, महाराष्ट्र सरकारसोबत बोलणी करण्याचे सांगितले आहे.

अडकलेल्या तरुणांची नावे -

  1. प्रवीण रावत, निवासी- बडकोट, जिल्हा-उत्तरकाशी.
  2. हरिमोहन रावत, निवासी- बड़कोट, जिल्हा-उत्तरकाशी.
  3. मुकेश रावत, निवासी- चकराता, जिल्हा-डेहराडून.
  4. अमन रावत, निवासी- चिन्याली सौड, जिल्हा-उत्तरकाशी.
  5. मयंक भंडारी, निवासी- डुंडा, जिल्हा-उत्तरकाशी.
  6. जगवीर बिष्ट, निवासी- डुंडा, जिल्हा-उत्तरकाशी.

ABOUT THE AUTHOR

...view details