एकनाथ शिंदे, अजित पवार आहे भाजपाची 'बी' टीम; पाहा काय म्हणाले एमआयएमचे उमेदवार - Lok Sabha Election 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 20, 2024, 6:37 PM IST

thumbnail

पुणे Lok Sabha Election 2024 : पुणे लोकसभा मतदार संघासाठी भाजपाने मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना तर काँग्रेसने रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना तसंच वंचितनं वसंत मोरे (vasant More) आणि आत्ता एमआयएमनं अनिस सुंडके (Anis Sundke) यांना उमेदवारी जाहीर केल्यानं पुण्यात चौरंगी लढत होणार आहे. यावेळी अनिस सुंडके यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचं पक्ष सोडण्याचं कारण काय याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, अजित पवार यांनी जी भाजपासोबत जाण्याची भूमिका घेतली आहे, ती योग्य नसल्यानं दुसरा सेक्युलर पक्ष कोणता असा विचार केला आणि मग आत्ता मी असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षात प्रवेश केला असल्याचं त्यांनी सांगितलं.

भाजपाची बी टीम : पुणे लोकसभा मतदार संघातून एमआयएम पक्षाने माजी स्थायी समिती अध्यक्ष अनिस सुंडके यांना उमेदवारी जाहीर केलीय. त्यांच्या या उमेदवारीनंतर एमआयएम भाजपाची बी टीम असून मतांचं विभाजन करण्यासाठी उमेदवारी देण्यात आली असल्याची टीका होऊ लागली आहे. यावर पुण्याचे उमेदवार अनिस सुंडके म्हणाले की, काँग्रेसनं 70 वर्षात मुस्लिमांना अशीच भीती घालून 'ए, बी' टीम म्हटलंय. आम्ही नव्हे तर एकनाथ शिंदे 'ए' आणि अजित पवार 'बी' टीम आणि भाजपा 'सी' टीम असून मुस्लिम उमेदवार थांबला की, 'ए,बी' टीम सांगितली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.