ETV Bharat / state

'विको लॅबोरेटरीज'चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन - Yashwantrao Pendharkar passed away

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 26, 2024, 3:53 PM IST

Updated : May 26, 2024, 4:15 PM IST

Yashwantrao Pendharkar passed away : आयुर्वेदिक सौंदर्य प्रसाधन कंपनी 'विको लॅबोरेटरीज'चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं शुक्रवारी सायंकाळी निधन झालंय. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी नागपुरातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी शुभदा, मुले अजय, दीप, मुलगी दीप्ती, नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.

Yashwantrao Pendharkar passed away
Yashwantrao Pendharkar passed away (Reporter ETV Bharat)

नागपूर Yashwantrao Pendharkar passed away : आयुर्वेदिक सौंदर्य प्रसाधन बनवणाऱ्या विको लॅबोरेटरीजचे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं शुक्रवारी सायंकाळी निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. यशवंत पेंढारकर 2016 मध्ये विको कंपनीचे चेअरमन झाले होते.

2016 मध्ये विको कंपनीचे अध्यक्ष : यशवंतराव पेंढारकर यांनी कायद्याची पदवी (LLB) घेतली होती. शिक्षण पूर्ण करून ते विको समूहात रुजू झाले होते. त्याच्या कायदेशीर अभ्यासाचा विको ग्रुपला वेळोवेळी फायदा झाला आहे. जवळपास 30 वर्षे चाललेला सेंट्रल एक्साइज विरुद्धचा खटला जिंकण्यात कंपनीला यश आलं होतं. त्यांनी काही काळ कंपनीत संचालक म्हणून जबाबदारीही सांभाळली होती. त्यानंतर 2016 मध्ये त्यांनी विको कंपनीचे अध्यक्ष पद संभाळलं होतं. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनी उंचीवर पोहचली होती.

'विको'ला मिळाले पुरस्कार : त्यांच्या अध्यक्षतेखाली, कंपनीला इकॉनॉमिक टाइम्सचा 'ब्रँड ऑफ द इयर 2023' हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळालाय. त्यांच्या कार्यकाळात कंपनीला निर्यातीसंबंधीचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून औद्योगिक जगतात त्यांची ओळख होती. संस्कृत भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं. त्यांना धार्मिक पुस्तके वाचण्याची खूप आवड होती. त्यांच्या निधनानं एक उद्योजक हरपला आहे.

हे वाचलंत का :

  1. ठाकरे गटावर शोककळा! दक्षिण मुंबईतील माजी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांचं निधन - Pandurang Sakpal passed away
  2. कार्यकर्त्यांच्या हाकेला धावून जाणारा नेता हरपला, आमदार पी. एन. पाटील यांचं निधन - PN PATIL News
  3. प्रतापराव भोसले यांच्या निधनानं सुसंस्कृत, निष्ठावान नेतृत्व हरपलं... नाना पटोले यांची प्रतिक्रिया - Prataprao Bhosale Death
Last Updated : May 26, 2024, 4:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.