ETV Bharat / state

जादूटोण्याचा संशय; ७५ वर्षीय वृद्धला पेटलेल्या निखाऱ्यांवरून चालवलं; वृद्ध गंभीर जखमी, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात खळबळ

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 6, 2024, 10:20 PM IST

Updated : Mar 6, 2024, 10:29 PM IST

Grandfather was walk over Burning Coals
वृद्धला आगीच्या निखाऱ्यावर नाचवलं

Suspected of Witchcraft : मुरबाडमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. भुताटकीच्या संशयातून एका 75 वर्षीय वृध्दाला निखाऱ्यावर नाचण्यास सांगितलं आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील केरवेळे गावात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे गावातून संताप व्यक्त केला जात आहे.

७५ वर्षीय वृद्धला पेटलेल्या निखाऱ्यांवरून चालवलं

ठाणे Suspected of Witchcraft : गावात अघोरी कृत्य करून भुताटकी करण्याच्या संशयातून निर्दयीपणे ग्रामस्थांच्या जमावानं एका 75 वर्षीय वृद्धला आगीच्या जळत्या निखाऱ्यावर नाचविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या घटनेत वृद्ध होरपळून गंभीर जखमी झाला आहे. ही घटना ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात असलेल्या केरवेळे गावात घडली आहे. दुसरीकडं या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. लक्ष्मण भावार्थे असं होरपळून गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचं नाव आहे. तर दुसरीकडं या घटनेच्या संदर्भात गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी दिलीय.



आगीच्या निखाऱ्यावर नाचवलं : मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात असलेल्या केरवेळे गावात लक्ष्मण भावार्थे हे वयोवृद्ध कुटुंबासह राहतात. या गावातील काही ग्रामस्थांना वृद्ध लक्ष्मण यांच्यावर संशय होता की, वृद्ध लक्ष्मण हे तंत्रमंत्र विद्या आणि अघोरी कृत्य करून भुताटकी करतात. त्यातच 4 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास केरवेळे गावात मंदिरसमोर ग्रामस्थांनी जागरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या रात्री जागरणाचा गोंधळ सुरू असताना त्याच गावातील रहाणारे 15 ते 20 जण वृद्ध लक्ष्मण भावार्थे यांच्या घरात घुसून त्यांना घराबाहेर ओढत नेले. त्यानंतर जागरणाच्या ठिकाणी घेऊन गेले आणि आगीच्या निखाऱ्यावर नाचवलं. हा भयानक प्रकार करत असतानाच, वृद्ध लक्ष्मण यांना काही तरुण ग्रामस्थ 'तू करणी करतो' असं म्हणून मारहाण केल्याचं व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

लक्ष्मण बेडू भावार्थे राहणार करवेळा तालुका मुरबाड यांना ते जादूटोणा करीत असल्याच्या संशयावरून त्याच्या घरात घुसून गावातील गोंधळाच्या ठिकाणी नेऊन पेटत्या विस्तवावरून जबरदस्तीनं चालण्यास लावून अमानुष छळ केला. त्यांच्या तळपायांना दुखापत झाली आहे. याप्रकरणी गुन्हा करण्यात आला आहे. - प्रमोद बाबर पोलीस निरिक्षक, मुरबाड पोलीस स्टेशन


राजकीय दबावापोटी अद्यापही गुन्हा दाखल नाही : आगीच्या जळत्या निखाऱ्यावर नाचवल्यानं त्या 75 वर्षीय वृध्द लक्ष्मण यांना होरपळून गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या पायाला फोड आले आहेत. तसंच पाठीच्या अंगाच्या कातडी जळाल्या आहेत. याबाबत लक्ष्मण भावार्थे यांच्या मुलीने मुरबाड पोलीस स्टेशन गाठलं. या संर्दभात मुरबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रमोद बाबर यांच्याशी संपर्क साधला असता, सद्या मी बाहेर असून पोलीस ठाण्यात गेल्यावर आपणास अधिक माहिती कॉल करून देण्यात येईल, असं बोलून अधिक बोलणं टाळल्यानं राजकीय दबावापोटी अद्यापही गुन्हा दाखल होत नसल्याची माहिती, सूत्राने दिली. मात्र काही वेळाने पुन्हा कॉल करून माहिती दिली की, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून आरोपीचा शोध सुरू केल्याचंही वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबर यांनी सांगितलं. तसंच भादंवि कलम 452, 324, 323, 341, 143, 147 सह महाराष्ट्र नरबळी, इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी प्रथा तसेच जादूटोणा प्रतिबंध करण्याबाबत आणि त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 कलम 3 प्रमाणे मुरबाड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा -

  1. Sacrificed Girl Child यूट्यूबवर काळी जादू पाहून अघोरी कृत्य, सात वर्षाच्या चिमुकलीचा दिला बळी
  2. Mantrik Arrest Thane : अमावास्येच्या रात्री तरूणींवर अघोरी कृत्य करणाऱ्या दोन भोंदू मांत्रिकासह ७ जणांना अटक
  3. Black Magic Bail To Maulana : ताईत देणं म्हणजे 'ब्लॅक मॅजिक' नाही, मौलानाला जामीन; अंनिस करणार अपील
Last Updated :Mar 6, 2024, 10:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.