ETV Bharat / state

Black Magic Bail To Maulana : ताईत देणं म्हणजे 'ब्लॅक मॅजिक' नाही, मौलानाला जामीन; अंनिस करणार अपील

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 4, 2023, 8:02 PM IST

Updated : Sep 4, 2023, 8:31 PM IST

Black Magic Bail To Maulana
मौलानाला जामीन

Black Magic Bail To Maulana : ताईत देणं म्हणजे 'ब्लॅक मॅजिक' नाही, असं सांगत आज मौलानाला मुंबई उच्च न्यायालयानं जामीन दिलाय. अंनिसनं त्यावर अपील करणार असल्याचं म्हटलंय. हे प्रकरण नक्की काय आहे, ते सविस्तर जाणून घेऊया. (Bombay High Court)

मुंबई Black Magic Bail To Maulana : बायकोला बाधा झाली म्हणून नवरा आणि सासू-सासऱ्यांनी सुनेला हाफिज जावेद मौलाना किल्लेदार यांच्याकडं उपचारासाठी नेलं होतं. ही घटना जून 2023 च्या पहिल्या आठवड्यात घडली. मौलाना विरोधात 'अघोरी कृत्य ब्लॅक मॅजिक कायदा' अंतर्गत इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र, मौलानानं अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. तेव्हा ताईत देणं, रक्षा लावणं ही बाब ब्लॅक मॅजिकमध्ये येत नाही, असं सांगत मुंबई उच्च न्यायालयाच्या एक सदस्य खंडपीठानं जामीन दिलाय. त्यामुळं मौलानाला दिलासा मिळाला. न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांनी हा जामीन मंजूर केला.


मौलानाला जामीन मिळाला : अरसिया असगर केरुरे नावाच्या महिलेला बाधा झाल्याचं सांगून तिला ठीक करण्यासाठी नवरा असगर केरुरे व सासू-सासर्‍यांनी मौलानाकडे नेलं होतं. मौलानानं ताईत दिला होता, रक्षा देखील दिली. परंतु त्या महिलेनं अघोरी प्रथा अंधश्रद्धा निर्मुलन कायदा 2013 या अंतर्गत 10 जून 2023 रोजी इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. त्यामुळे मौलानाला अटक करण्यासाठी पोलिसांनी तयारी केली होती. मात्र आज मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. तेव्हा ताईत देणं, रक्षा लावणं हे ब्लॅक मॅजिक कायद्यात येत नाही, असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयानं जामीन देण्याचा निर्णय दिलाय. त्यामुळं मौलानाला जामीन मिळाला.

कोणतंही अपराध कृत्य नाही : अटक होण्याअगोदर जावेद किल्लेदार मौलाना यानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याच्यावतीनं वकील अतीत शिरोडकर यांनी बाजू मांडली की, ब्लॅक मॅजिक कायदा 2013 मध्ये ताईत देणं, रक्षा लावणं, हे येत नाही. ही सर्वसाधारण बाब आहे. तसंच कोणतंही अपराध कृत्य केलेलं नाही. त्यामुळंच न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठाने आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर केलाय. सासू-सासर्‍यांनाही अंतरिम जामीन दिलाय. (talisman is not black magic)

हमीद दाभोलकर यांची प्रतिक्रिया - यासंदर्भात अंनिसचे डॉ. हमीद दाभोलकर यांच्याशी ईटीव्ही भारतने संपर्क साधला असता त्यांनी यासंदर्भातील कोर्टाचं नेमकं म्हणणं काय आहे, याचा अभ्यास करणार असल्याचं स्पष्ट केलं. तसंच याबाबत वरिष्ठ न्यायालयात जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच शासनाकडूनही त्यांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या.

आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करून लोकांना फसवणे हा जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा आहे. ह्या पार्श्वभूमीवर बाहेरची बाधा उतरवण्याचा दावा करून ताईत बांधणे हा गुन्हा होतो. उच्च न्यायालयाच्या निकाल पत्राचा अभ्यास करून महा. अंनिस या विषयी वरिष्ठ न्यायालयात दाद मागेल. या केसमुळे महाराष्ट्र शासनाने जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम करणे किती आवश्यक आहे ते अधोरेखित होते. याची नोंद घेऊन शासनाने लवकरात लवकर जादुटोणा विरोधी कायद्याचे नियम करणे आवश्यक आहे. - डॉ. हमीद दाभोलकर, कार्यकर्ता अंनिस


'498 कलम अ' अंतर्गत देखील गुन्हा : अरसिया हिचे असगर अली केरुरे याच्यासोबत 20 मे 2022 रोजी लग्न झालं होतं. 21 मे 2022 रोजी रात्री त्यानं बायकोला सांगितलं की, लग्नामध्ये तुझ्या बापाने माझ्यासाठी घोडा पाठवला नाही. आमची मान प्रतिष्ठा तुम्ही राखली नाही. 25 मे 2022 रोजी असगरचा वाढदिवस होता. त्यामुळं त्यानं बायकोला स्वतःच्या बापाकडून घड्याळ, गॉगल, केक या सर्व वस्तू घेऊन यायला सांगितलं, असा आरोपही एफआयआरमध्ये बायको अरसिया हिने केलाय. त्यामुळे त्याच्या विरोधात '498 कलम अ' अंतर्गत देखील गुन्हा नोंदवलाय. (black magic case)


हेही वाचा..

  1. Black Magic Girl Death : भूताटकीच्या संशयातून चिमुकुलीची हत्या प्रकरण, व्हिडिओत पुरावा आढळल्याने अल्पवयीन चुलत भाऊ-बहिणीला अटक
  2. Blind Faith in Kolhapur : अंधश्रद्धेचा कळस! मुलींना वश करण्यासाठी कोल्हापुरात अघोरी कृत्य
  3. Mantrik Arrest Thane : अमावास्येच्या रात्री तरूणींवर अघोरी कृत्य करणाऱ्या दोन भोंदू मांत्रिकासह ७ जणांना अटक
Last Updated :Sep 4, 2023, 8:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.