ETV Bharat / state

ऐन उन्हाळ्यात तुमचं गाव टँकरमुक्त करायचंय? बीडमधील 'या' गावाचा घ्या आदर्श - Pitthi Tanker Free Village

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 26, 2024, 9:38 PM IST

Pitthi Tanker Free Village : गेल्या दोन वर्षांपासून बीड जिल्ह्यातील पिठी या गावाला जलजीवन योजनेची मंजुरी मिळाली आणि या गावाने या योजनेत परिपूर्ण काम करून गावातील प्रत्येक नागरिकांच्या घरी समान पाणी वाटप या पद्धतीने प्रत्येकाला पाणी देण्याचे काम केलं आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात ग्रामीण भागातून टँकरची मागणी मोठ्या प्रमाणात झाली. जिल्ह्यातील अनेक विहिरी, बोरवेल अधिग्रहण करण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी प्रशासन मोठ्या प्रमाणात काम करत आहे.

Pitthi Tanker Free Village
पिठ्ठी गाव (ETV Bharat Reporter)

बीड Pitthi Tanker Free Village : बीड जिल्हा म्हटलं की, दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. या बीड जिल्ह्यात कधी अवकाळी तर कधी कोरडा दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांसह, नागरिकांना करावा लागतो. मागील वर्षी तर अत्यल्प प्रमाणात पाऊस पडल्याने बीड जिल्ह्यातील 143 प्रकल्पात अत्यल्प प्रमाणात पाणीसाठा झाला. यामुळे शेतीसह शहरात राहणाऱ्या नागरिकांनाही पाण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागात जिल्ह्यातील 321 गावे, 293 वाड्या, 399 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. बीडच्या पाटोदा तालुक्यातील पिठी हे एक टँकरमुक्त गाव म्हणून या गावाची ओळख आहे.

पिठ्टी गावातील टॅंकरमुक्त स्थितीविषयी सांगताना गावकरी (ETV Bharat Reporter)

बीड जिल्ह्यात तालुका निहाय अशी आहे टँकरची संख्या
गाव लोकसंख्या टॅंकर
1) बीड- 246475 134
2) वडवणी - 18188 12
3) गेवराई - 168764 106
4) शिरूर - 37720 29
5) पाटोदा - 37191 26
6) आष्टी - 78106 43
7) केज- 10495 06
8) अंबाजोगाई - 5080 03
9) परळी - 21077 08
10) माजलगाव - 4172 04
11) धारूर - 15834 11

----------------------------------------------
एकूण- 643102 382

शहरवासी पाण्यासाठी हैराण : 6 लाख 43 हजार 102 लोकांना 382 टँकरद्वारे बीड जिल्ह्यातील जनतेला पिण्यासाठी पाणीपुरवठा प्रशासनाकडून केला जातो. गावात असलेल्या विहिरी आणि बोरवेल अधिग्रहण केल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेची तहान काही प्रमाणात तरी भागत आहे. मात्र बीड जिल्ह्यात असलेली तालुक्याची ठिकाणी वास्तव्यास असलेले नागरिक यांच्या मात्र खिशाला कात्री लागत आहे. कारण शहरांमध्ये पाणी विकत घ्यावे लागत आहे. 20 ते 25 दिवसाला शहरातील नगरपालिका व नगरपंचायती शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करत आहेत. तेही पाणी तब्बल दोनच तास सुटत असल्याने नागरिकांपुढे मोठे आव्हानच आहे. कधी रात्री मी रात्री पाणी सोडत असल्यामुळे शहरातील नागरिकांना तीही पाणी मिळत नाही. त्यामुळे शहरातील नागरिक आता हैराण झाले आहेत. पाणी विकत घेऊन जगावं लागत आहे. त्यामुळे आता नागरिकांना पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहराच्या ठिकाणी असलेले बोरवेल्स हे अधिग्रहण केलेले नाहीत. त्यामुळे या ठिकाणी पाण्याचे टँकर विकून आपली उपजीविका भागवणाऱ्यांची संख्या देखील या कालावधीत वाढताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील एकूणच परिस्थिती पाहता शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना पाण्यासाठी करावा लागत आहे.

आम्हाला प्रत्येक दोन दिवसाला आमच्या नळाला पाणी येते. त्यामुळे आम्हाला पाण्याची कसलीच अडचण नाही. गावामध्ये गेल्या दोन वर्षापासून आम्हाला पाणी आणण्यासाठी कुठल्याही नळावर किंवा कोणाच्याही घरी पाणी भरण्यासाठी जावे लागत नाही. तर टँकरसुद्धा आमच्या गावात येत नाही आणि आम्हाला टँकरची गरजही भासली नाही. ज्या गावात टँकर आहेत त्या गावातील नागरिकांना हांडे घेऊन टँकरवर पाणी भरण्यासाठी जावं लागतं. गावात वाद विवाद होतात. मात्र आमच्या गावात आमच्या नळाला पाणी येत असल्यामुळे आमचं गाव टँकरमुक्त आहे. त्यामुळे आम्हाला कसलीच अडचण नाही. --- द्वारका सोपान कुडके, ग्रामस्थ

ज्या ज्या वेळी लाईट येईल त्यावेळी टाकी भरण्याचं काम मी करत असतो. अनेक अडचणींचा सामना आम्हाला करावा लागतो आणि गावकऱ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्न करत असतो. सर्व गावकऱ्यांनी मिळून विचार केला आणि गाव टँकर मुक्त केले आहे. विशेष म्हणजे, गावापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरी साठवून तलावातून जल जीवनची पाईपलाईन आम्ही गावात आणली आणि तेव्हापासून आमच्या गावाला पिण्याच्या पाण्यासाठी कसलीही अडचण नाही. आता तरी अडचण असली तरी गावातील सर्व नागरिकांनी मिळून बाजूला असलेली विहीर अधिग्रहण केलेली आहे. यामधून आम्हाला पिण्यासाठी पाणी मिळते. त्यामुळे आम्हाला कसलीही अडचण भासत नाही. --- अनिल भोंडवे, पाणी व्यवस्थापक

गावामध्ये 2022 पासून योजना राबवली आणि फिरून कनेक्शनच्या माध्यमातून प्रत्येक घराला योग्य पाणीपुरवठा सम प्रमाणात करण्यासाठी या कनेक्शनचा आम्ही वापर केला. त्याचबरोबर गावात असलेल्या जुन्या विहीरीचे खोदकाम करून पिण्यासाठी लागणारे पाणी आम्ही उपलब्ध करत आहोत. स्वच्छ व समान पाणी वाटप केल्यामुळे गावातील कुठल्याही व्यक्तीला किंवा महिलेला बाहेरून पाणी आणण्याची आवश्यकता पडत नाही. आमचं गाव टँकरमुक्त आहे याचा आम्हाला आनंद आहे. त्यामुळे आम्ही सर्व ग्रामस्थांनी विचार करून पाण्याचा कसा काटकसरीने वापर करायचा हे ग्रामसभेमध्ये सांगितलं. त्यामुळे सर्व ग्रामस्थ आणि महिला पाण्याचा काटकसरीने वापर करत आहेत. त्यामुळे आम्ही आमचं गाव टँकरमुक्त ठेवण्यास यशस्वी झालो आहोत. पाटोदा तालुक्यातील हे आमचं पहिलंच गाव आहे की, ते आज गेली दोन वर्षांपासून टँकरमुक्त आहे. त्यामुळे आम्हाला त्याचा आनंद होत आहे. --- प्रभु कवठेकर, सरपंच पती

आमच्या गावात गेल्या दोन वर्षांपासून कसल्याही प्रकारची टँकरची आवश्यकता भासत नाही. दुसरा म्हणजे अनेक दिवसांपासून जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती आपण सर्वांनी पाहिली आहे; मात्र आमच्या गावात पाण्याचं आम्ही नियोजन करत आहोत आणि पाणी काटकसरीने वापरत आहोत. ग्रामसभेमध्ये आम्ही याचा निर्णय घेऊन सर्वांना पाण्याचा काटकसरीने वापर करा, असं सर्वांना सांगितले आहे. या सर्वांनी त्याच्यासाठी आम्हाला मदत केली आहे. त्यामुळे आमचं गाव आज टँकरमुक्त झालं आहे.--- बाळासाहेब कवठेकर, ग्रामस्थ

हेही वाचा :

  1. राज्यातील 48 मतदारसंघांत कोण मारणार बाजी? तुमच्या भागाचा कोण खासदार? जाणून घ्या 'ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट - Lok Sabha Election 2024
  2. EXCLUSIVE : "...तर उद्धव ठाकरेंनी शरद पवारांनाही धोका दिला असता"; 'ईटीव्ही भारत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप - CM Eknath Shinde Interview
  3. चक्रीवादळ 'रेमाल' आज पश्चिम बंगालला धडकणार, देशातील 'या' भागाकरिता सतर्कतेचा इशारा - Cyclone Remal Landfall
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.