ETV Bharat / state

पक्ष विलिन न करता एनडीएत सहभागी व्हावं; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवार यांना ऑफर - Pm Modi Offered To Sharad Pawar

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 10, 2024, 1:08 PM IST

Updated : May 10, 2024, 1:29 PM IST

Pm Modi Offered To Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नंदुरबार इथं बोलताना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मात्र दुसरीकडं त्यांनी शरद पवार यांना एनडीएत सहभागी होण्याची ऑफर दिली.

Pm Modi Offered To Sharad Pawar
संपादित छायाचित्र (ETV Bharat Marathi)

नंदुरबार Pm Modi Offered To Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबार इथं बोलताना पुन्हा एकदा नकली शिवसेना म्हणत उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे. त्यामुळे उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील वितुष्ट आणखी चिघळलं आहे. दुसरीकडं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना एनडीएमध्ये सहभागी होण्यासाठी ऑफर दिली आहे. शरद पवार यांनी लहान पक्ष काँग्रेस पक्षात विलिन होतील, अशी शक्यता वर्तवली होती. यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना एनडीएत सहभागी होण्याची ऑफर दिली.

शरद पवारांनी एनडीएमध्ये सहभागी व्हावं : लोकसभा निवडणूक 2024 च्या चौथ्या टप्प्याच्या मतदानाची रणधुमाळी सुरू झाली आहे. तिसऱ्या टप्प्याचं मतदान झाल्यानंतर शरद पवार यांनी लहान पक्ष निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलिन होतील, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबार इथल्या सभेत शरद पवार यांना ऑफर दिली आहे. "शरद पवारांनी नकली शिवसेना आणि नकली काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण न करता, एनडीएमध्ये सहभागी व्हावं," अशी ऑफर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

पंतप्रधान मोदींमुळे लोकशाही संकटात : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना एनडीएमध्ये सहभागी होण्याची ऑफर दिली. त्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चांना मोठं उधाण आलं आहे. त्यावर खुद्द शरद पवार यांनी पुण्यात प्रतिक्रिया दिली. "तीन टप्प्यातील मतदान झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे त्यांनी अशी ऑफर दिली असावी. मात्र लोकशाहीवर विश्वास नसणाऱ्यांसोबत जाणार नाही. त्यांनी नकली शिवसेना आणि नकली काँग्रेस असं म्हटलं आहे. मात्र एखाद्या पक्षाला नकली म्हणण्याचा अधिकार नरेंद्र मोदी यांना कोणी दिला," असा सवाल शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला. एखाद्या पक्षांच्या बाबतीत असं बोलणं चूक आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे, असंही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.

हेही वाचा :

  1. नकली शिवसेना मतांसाठी बॉम्बस्फोटातील आरोपीला खांद्यावर घेऊन नाचते; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल - Lok Sabha Election 2024
  2. "2016 मध्येच भाजपाबरोबर जाणार होतो, पण..."; 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सुनील तटकरेंचा मोठा गौप्यस्फोट - Sunil Tatkare Exclusive
  3. देशातील उरलेल्या निवडणुकीच्या चार टप्प्यात राम मंदिराचा मुद्दा भाजपा गाजवणार; फायदा होणार का? - Lok Sabha Election 2024
Last Updated : May 10, 2024, 1:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.