ETV Bharat / sports

माजी भारतीय क्रिकेटपटू दत्ताजीराव गायकवाड यांचं निधन, इरफान पठाणनं वाहिली श्रद्धांजली

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 13, 2024, 5:47 PM IST

Dattajirao Gaikwad passed away : भारताचे माजी क्रिकेटपटू दत्ताजीराव गायकवाड यांचं वयाच्या 95 व्या वर्षी गुजरातमधील वडोदरा येथील राहत्या घरी निधन झालंय. दत्ताजीराव गायकवाड 'हे' भारतातील सर्वात वयस्कर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होते.

Etv Bharat
Etv Bharat

नवी दिल्ली Dattajirao Gaikwad passed away : भारताचे माजी कर्णधार दत्ताजीराव कृष्णराव गायकवाड यांचं मंगळवारी बडोदा येथील राहत्या घरी निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. गायकवाड यांची कसोटी कारकीर्द 1952 ते 1961 पर्यंत होती. या काळात त्यांनी केवळ 11 कसोटी समाने खेळले आहेत. या त्यांनी 350 धावा केल्या होत्या. 1959 मध्ये इंग्लंडच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाचं त्यांनी कर्णधारपद भूषवलं होतं. परंतु तेव्हा संघानं पाचही कसोटी समाने गमावले होते.

बडोदा क्रिकेट संघाचे कर्णधार : 1959 मध्ये नवी दिल्लीत वेस्ट इंडिजविरुद्ध 52 धावा ही गायकवाडांची सर्वोच्च धावसंख्या होती. रणजी ट्रॉफीमध्ये दत्ताजीराव गायकवाड 1957-58 मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये बडोदा क्रिकेट संघाचे कर्णधार होते. गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बडोदा येथील मोतीबाग स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात बडोदा संघानं सर्व्हिसेस संघाचा एक डावासह 51 धावांनी पराभव केला होता. रणजीमध्ये गायकवाडांनी 14 शतकांसह 3 हजार 139 धावा केल्या होत्या. 1959-60 मध्ये महाराष्ट्राविरुद्ध नाबाद 249 धावा ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती. गायकवाड यांनी आणखी दोन द्विशतकंही केली आहेत. 1949-50 मध्ये गुजरातविरुद्ध त्यांनी नाबाद 128 तसंच 101 धावा केल्या होत्या.

क्रिकेटपटूच्या निधनाबद्दल शोक व्यक्त : गायकवाड हे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सी. एस नायडू यांचं विद्यार्थी होते. 1984 मध्ये, बडोद्याच्या महाराजांनी तरुण खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी सी.एस. नायडू यांची नियुक्ती केली होती. त्यावेळी, गायकवाड हे 12 वर्षांचे होते. त्यांनी माजी कर्णधार सी. एस नायडू यांनी सुरू केलेल्या पहिल्या अंडर-14 सह 16 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत भाग घेतला होता. गायकवाड माजी भारतीय क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचे वडील आहेत. त्यांनी अंशुमन गायकवाड यांनाही प्रशिक्षणही दिलं होतं. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर माजी क्रिकेटपटूच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

हे वाचलंत का :

  1. अंडर 19 विश्वचषक फायनल; ऑस्ट्रेलियानं चौथ्यांदा अंडर-19 विश्वचषक जिंकला, भारताचा 79 धावांनी पराभव
  2. इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तीन सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर, विराट कोहलीबाबत मोठं अपडेट
  3. वर्षभरात तिसऱ्यांदा आमने-सामने! रोहित, कोहलीचा बदला उदय घेणार का?
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.