ETV Bharat / sports

इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तीन सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर, विराट कोहलीबाबत मोठं अपडेट

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 10, 2024, 11:13 AM IST

Virat Kohli : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या 3 सामन्यांसाठी रवींद्र जडेजा आणि केएल राहुलचं संघात पुनरागमन झालं आहे. तर विराट कोहली बाबतही मोठं अपडेट आलं आहे. वाचा पूर्ण बातमी..

Virat Kohli
Virat Kohli

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या 3 सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. पहिल्या दोन सामन्यांनंतर मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे.

वैयक्तिक कारणांमुळे माघार : संघ निवडीबाबत सर्वात मोठी बातमी म्हणजे स्टार फलंदाज विराट कोहली उर्वरित तीन सामन्यांसाठीही उपलब्ध नाही. तो वैयक्तिक कारणांमुळे उपलब्ध नसल्याचं बीसीसीआयनं म्हटलं आहे. तसेच कोहलीच्या निर्णयाचा पूर्ण आदर आणि समर्थन असल्याचं बीसीसीआयनं नमूद केलं. विराट कोहलीनं वैयक्तिक कारणांमुळेच पहिल्या दोन सामन्यातून माघार घेतली होती.

जडेजा-राहुलचं पुनरागमन : रवींद्र जडेजा आणि केएल राहुल यांचं संघात पुनरागमन झालं आहे. मात्र वैद्यकीय टीमकडून फिटनेस मंजुरी मिळाल्यानंतरच त्यांचा सहभाग शक्य होईल. म्हणजे जडेजा आणि राहुल संघात परतले असले तरी ते खेळतील हे निश्चित नाही. जडेजा आणि राहुलला दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर राहावं लागलं होतं. भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना 15 फेब्रुवारीपासून खेळला जाणार आहे. राजकोटमध्ये हा सामना होईल. यानंतर चौथा सामना रांचीमध्ये 23 फेब्रुवारीपासून खेळला जाणार आहे. तर मालिकेतील कसोटी सामना 7 मार्चपासून धर्मशाला येथे होणार आहे.

शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल*, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर) , आर अश्विन, रवींद्र जडेजा*, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.

हे वाचलंत का :

  1. वर्षभरात तिसऱ्यांदा आमने-सामने! रोहित, कोहलीचा बदला उदय घेणार का?
  2. जसप्रीत बुमराहनं कसोटी क्रमवारीत मिळवलं अव्वल स्थान; 'अशी' कामगिरी करणारा क्रिकेटच्या इतिहासातील पहिलाच गोलंदाज
  3. चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, 'हा' स्टार फलंदाज स्वस्थ होऊन टीममध्ये परतला
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.