ETV Bharat / politics

कोल्हापुरातून संजय मंडलिकांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर; व्यक्त केला विजयाचा विश्वास - Sanjay Mandlik

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 29, 2024, 12:06 PM IST

Sanjay Mandlik : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात कोल्हापूरमधून विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलीय. मागील वेळेपेक्षा यावेळी अधिक मतांनी जनता आपल्याला विजयी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

कोल्हापुरातून संजय मंडलिकांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर; उमेदवारी मिळताच व्यक्त केला विजयाचा विश्वास
कोल्हापुरातून संजय मंडलिकांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर; उमेदवारी मिळताच व्यक्त केला विजयाचा विश्वास

खासदार संजय मंडलिक

कोल्हापूर Sanjay Mandlik : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आली. या यादीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. यामुळं खासदार मंडलिक हे तिसऱ्यांदा धनुष्यबाण चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून गतवेळी झालेल्या निवडणुकीत राज्यात दुसऱ्या क्रमांकाचं मताधिक्य मिळवलेल्या खासदार मंडलिक यांनी यावेळीही विक्रमी मताधिक्यांनी विजय मिळवणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय.


निवासस्थानाबाहेर फटाक्यांची आतषबाजी : शिवसेनेकडून राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघासाठी अधिकृत यादी जाहीर करण्यात आली. या पहिल्याच यादीत विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी कोल्हापुरातील त्यांच्या निवासस्थानाबाहेर फाटक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर प्रचारात त्यांनी आघाडी घेतल्याचं चित्र दिसत असताना महायुतीकडून मात्र कोल्हापूर लोकसभेच्या उमेदवारीसाठी चालढकल झाल्यानं सुरुवातीला मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळाली. मात्र आता त्यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, लोकसभा मतदारसंघातील विकास कामांच्या आणि लोकसंपर्काच्या बळावरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारीची माळ माझ्या गळ्यात टाकल्याचं खासदार संजय मंडलिक यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना स्पष्ट केलंय.

आमचं ठरलय, यंदा मात्र महायुतीनं ठरवलंय : गत लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आमचं ठरलंय हा फॉर्मुला समोर आणून संजय मंडलिक यांच्या मागं आपली ताकद उभी केली होती. यातूनच राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं मताधिक्य मिळवण्यात खासदार संजय मंडलिक यांना यश आलं होतं. यंदाच्या निवडणुकीत मात्र आमचं ठरलं ऐवजी महायुतीनं ठरवलंय ही घोषणा खासदार संजय मंडलिक यांनी केली.


हेही वाचा :

  1. अभिजीत अडसूळ निवडणुकीच्या रिंगणात; "नवनीत राणांचा गेम करणार" - Amravati Lok Sabha Constituency
  2. शिवसेनेच्या आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; श्रीकांत शिंदे, हेमंत गोडसेंचं नाव नाही - Shiv Sena releases candidates list
  3. “माझ्या वडिलांना काय बोलता? भिडायचे असेल तर…”; राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यात रंगला राजकीय कलगीतुरा - lok sabha elections
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.