ETV Bharat / politics

मौलवींच्या फतव्यानंतर राज ठाकरेंनी काढला फतवा; म्हणाले.... - Raj Thackeray Pune Sabha

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 10, 2024, 10:40 PM IST

Raj Thackeray Pune Sabha : पुणे लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 13 मे रोजी मतदान होत आहे. त्यामुळं आता प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शुक्रवारी पुण्यात सभा झाली. यावेळी त्यांनी मौलवींवर जोरदार टीका करत फतवा काढला.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

पुणे Raj Thackeray Pune Sabha : दोन चार दिवसांपूर्वी पुण्यातील कोंढवा येथे मुस्लिम समाजाच्या मौलवी यांनी फतवा काढत जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. हीच बाब समोर ठेवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील फतवा काढलाय. "जर मुस्लिम समाजातील मौलवी फतवा काढत असतील तर मी देखील माझ्या हिंदू समजातील लोकांना फतवा काढतो की, महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणा, अस यावेळी राज ठाकरे म्हणाले.

पुण्यात झाली सभा : पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी सभेत भाषण करताना फतवा काढला. पुण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विरुद्ध महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यात मुख्य लढत होत आहे.

राज ठाकरेंनी काढला फतवा : "देशात अनेक चांगले मुस्लिम लोकं आहे. पण, ज्यांना दहा वर्षात डोकं वर काढायला मिळालं नाही ते आज फतवे काढत आहेत. मी देखील फतवा काढतो की, महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा," असं म्हणत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी आणि मुस्लिम समाजात्ली 'त्या' मौलवींवर जोरदार टीका केली. "विवादित मशीद पडल्यानंतर वाटलं नव्हतं की तिथं राम मंदिर होईल, पण आज जे राम मंदिर झालं आहे. हे सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळं झालं," असं म्हणत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं.

राज ठाकरेंनी अजित पवारांचं केलं कौतुक : राज ठाकरे यांनी अजित पवार यांचा उल्लेख करत म्हणाले की, "अजित पवार यांच्याबाबतीत माझ्या मनात अनेक मतमतांतरं असतील. पण, त्यांची एक चांगली बाब म्हणजे, त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहून देखील कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही." अजित पवार यांचे नेहमी नक्कल करणाऱ्या राज ठाकरे यांनी आता मात्र अजित पवार यांचं कौतुक करायला लागले असल्याचं दिसून आलं.

निवडणुकीत विषयच नाहीत : राज ठाकरे पुढे म्हणाले की, "देशात सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहेत. देशातील सर्व निवडणुका मी जवळून पाहत होतो. आतापर्यंत झालेल्या अनेक निवडणुका मी पाहिल्या, ज्यात वेगवेगळे विषय होते. पण, ही पहिली निवडणूक बघतोय ज्यामध्ये विषयच नाहीये. विषय नसल्यानं प्रत्येकजण आई, बहीण काढत आहेत. महाराष्ट्र हा कधीही असा नव्हता. इतर राज्यात ते चालत होतं. पण या सुसंस्कृत राज्यात हे पहिल्यांदाच होत आहे."

हेही वाचा -

  1. खासदार अमोल कोल्हेंचा मतदानापूर्वी 'मोठा डाव'; केली 'ही' मोठी घोषणा - lok sabha election
  2. मराठी भाषेवर अन्याय होत असताना मराठी कलाकार मूग गिळून गप्प का? काय आहेत कारणे? - Renuka Shahane On Marathi Artist
  3. "सत्तेत आल्यानंतर राम मंदिराचं.... "; नाना पटोलेंचं आश्वासन - Nana Patole About Ram Temple
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.