ETV Bharat / politics

उमेदवारांची शेवटच्या दिवशी प्रचारघाई... मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं योग्य मतदान करण्याचं आवाहन - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 18, 2024, 10:47 PM IST

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील अंतिम टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी प्रचाराची घाई केल्याचं पाहायला मिळालं. मुंबईतील सर्वच लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार आणि वरिष्ठ नेत्यांनी सभा घेऊन आणि प्रचार यात्रा काढून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.

Lok Sabha Election 2024
उमेदवारांची प्रचारघाई (Mumbai Reporter)

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची प्रचारघाई (Mumbai Reporter)

मुंबई Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील अंतिम टप्प्यातील आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पाच वाजेपर्यंत सर्वच पक्षांनी आणि उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व तऱ्हेचे प्रयत्न केले. काही ठिकाणी प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते, तर काही ठिकाणी प्रचार यात्रा काढण्यात आल्या होत्या.


मुख्यमंत्र्यांचा मुंबईत प्रचार दौरा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज मुंबईत प्रचार दौरा काढला. त्यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांच्या प्रचार यात्रेत भाग घेतला. तर त्यानंतर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्या प्रचाराच्या विकास रथावर उभे राहून त्यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं. वीस तारखेनंतर आपण दिवाळी साजरी करणार असून आपले राहुल शेवाळे आणि यामिनी जाधव हे उमेदवार जास्तीत जास्त मतांनी निवडून येतील, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

ही निवडणूक संपूर्ण देशाची : पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आज प्रचाराचा शेवटचा दिवस असला तरी सर्व कार्यकर्त्यांनी आणि उमेदवारांनी उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तसंच सोमवारी मतदाना दिवशी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. जास्तीत जास्त मतदान करून आपले उमेदवार निवडून येतील याची काळजी घ्या. ही निवडणूक केवळ मुंबईची किंवा महाराष्ट्राची नसून ही संपूर्ण देशाची आणि विकासाची निवडणूक आहे असंही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.



मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री प्रचारात सहभागी : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव सहभागी झाले होते. राहुल शेवाळे यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करा असं आवाहन त्यांनी या प्रचार यात्रेदरम्यान केलं.



योगी आदित्यनाथ यांची कुर्ला येथे सभा : उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर सभा घेतली. ही सभा पाच वाजता बरोबर संपवण्यात आली. या सभेला आशिष शेलार यांच्यासह अन्य भाजपाचे नेते उपस्थित होते. उज्वल निकम यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या असं आवाहन यावेळी योगी आदित्यनाथ यांनी केलं.



शिंदे शिवाजीपार्कवर तर ठाकरे मुंबादेवीच्या दर्शनाला : प्रचाराची सांगता झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहूल शेवाळे यांच्यासोबत शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांचं दर्शन घेतलं, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील मुंबादेवी येथे जाऊन दर्शन घेतलं. त्यांच्यासोबत आमदार आदित्य ठाकरे आणि उमेदवार अरविंद सावंत यांनीही दर्शन घेतलं.


प्रकाश आंबेडकर यांची स्कूटरवरून यात्रा : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर निघाले होते. मात्र, ते वाहतूक कोंडीत अडकले असता, प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याकारणानं पाच वाजण्यापूर्वी सभास्थळी पोहोचण्यासाठी त्यांनी एका कार्यकर्त्याच्या स्कूटरवर बसून प्रवास करणं पसंत केलं.

हेही वाचा -

  1. 'इंडिया' आघाडी पत्रकार परिषद : पंतप्रधान मोदींना अद्यापही नवाज शरीफांच्या केकची आठवण; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले संघावर घालतील बंदी - India Alliance Press Conference
  2. संघ परिवारातील संस्था स्वयंपूर्ण व्हाव्या ही तर संघाची भूमिका; नड्डांच्या 'त्या' वक्तव्यावर संघ अभ्यासकांचं मत - JP Nadda on RSS
  3. सहानुभूतीवर नाही तर डोळसपणे मतदान करावं..; मंत्री दीपक केसरकराचं मुंबईकरांना आवाहन - Lok Sabha Election 2024
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.