ETV Bharat / politics

पालघरमध्ये शिंदेंना धक्का! विद्यमान खासदाराचा पत्ता कट करत भाजपानं 'या' नेत्याला दिलं तिकीट - Palghar Lok Sabha 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 2, 2024, 10:31 PM IST

Updated : May 2, 2024, 10:45 PM IST

Lok Sabha Election 2024 : पालघरची जागा भाजपाच्या वाट्याला आली आहे. त्यामुळं भाजपानं आपला उमेदवार जाहीर केलाय. यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय.

Lok Sabha Election
पालघरमध्ये शिंदेना धक्का! शिंदे गटाच्या विद्यमान खासदराचा पत्ता कट करत भाजपानं 'या' नेत्याला दिलं तिकीट (ETV Bharat Maharashtra Desk)

मुंबई/पालघर Lok Sabha Election 2024 : पालघर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपानं हेमंत विष्णू सावरा यांना तिकीट दिलंय. ते भाजपाचे दिवंगत नेते विष्णु सावरा यांचे पुत्र आहेत. पालघरच्या जागेचा मुद्दा भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात अडकला होता. अखेर ही जागा आपल्याकडं आणण्यात भाजपाला यश आलंय. मोठी बाब म्हणजे या जागेवरुन शिंदे गटाचे राजेंद्र गावित हे विद्यमान खासदार आहेत. त्यांचा पत्ता कट करण्यात आलाय.

महायुतीत सुरू होती रस्सीखेच : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून पालघर जागेच्या वाटणीमध्ये महायुतीमध्ये चढाओढ सुरू होती. ठाण्याची जागा शिवसेनेकडं गेली होती. त्यानंतर पालघरचा उमेदवार भाजपा ठरवेल हे जवळपास निश्चित झालं होतं. निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांमध्ये विशेष स्पर्धा नसताना देखील महायुतीतर्फे पालघर लोकसभेची उमेदवारी सर्वात अखेरीस घोषित करण्यात आली.

ठाकरे गटाच्या भारती कदम यांच्याशी होणार सामना : पालघरच्या जागेवरुन हेमंत सावरा यांना तिकीट द्यावं, अशी मागणी भाजपाचे कार्यकर्ते करत होते आणि त्यामुळंच त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षानं घेतलाय, अशी चर्चा आहे. या जागेवर हेमंत सावरा यांची लढत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कदम यांच्याशी होणार आहे.

हेही वाचा :

  1. 'ईटीव्ही भारत'च्या उलटतपासणीला उज्वल निकम यांनी दिली मनसोक्त उत्तरं; पाहा खास मुलाखत - Ujjwal Nikam Interview
  2. उमेदवारी जाहीर होताच महायुतीचे नेते 'राज'दरबारी, काय आहे भेटीचं गणित? - Lok Sabha Election 2024
  3. राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघ ठरवणार खरी शिवसेना कोणाची? 'या' मतदारसंघात दोन शिवसैनिक आमनेसामने - shivsena against shivsena
Last Updated : May 2, 2024, 10:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.