ETV Bharat / politics

Loksabha Election 2024 : कल्याणची जागा जिंकायची आहे ना? अजित पवार गटाचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 12, 2024, 3:33 PM IST

Loksabha Election 2024 : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गट यांच्यातील संघर्ष आता टिपेला पोहोचला आहे. शिवतारे यांच्या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान देत कल्याणची जागा जिंकायची आहे ना? अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असा इशाराच दिला आहे.

Loksabha Election 2024
अजित पवार गटाचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा

मुंबई Loksabha Election 2024 : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला इशारा दिला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ हा कुणाचा सातबारा नाही. बारामती मधील जनता आता पवार कुटुंबीयांना कंटाळली आहे. त्यामुळं या लोकसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढवणार आहोत, असा इशारा देत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या संदर्भात शिवतारे यांनी अपशब्दही उच्चारले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवतारे यांनी आपण पुन्हा एकदा लोकसभा (Loksabha Election) लढणार असल्याचं सांगून अजित पवार गटाला शह देण्याचा प्रयत्न केला आहे.

अजित पवार गटाकडून प्रत्युत्तर : या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी विजय शिवतारे यांच्या संदर्भात अपशब्द उच्चारले आणि कुणीही आगाऊपणा करण्याचा प्रयत्न करू नये. कुणी कुठून लढायचं याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल, त्यामुळं शिवराळ शिवतारे यांनी आपल्या शब्दांना आणि भावनांना आवर घालावा असा सज्जड दम मिटकरी यांनी दिला आहे.

थेट मुख्यमंत्र्यांनाच दिला इशारा : याच पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि माजी खासदार आनंद परांजपे (Anand Paranjpe) म्हणाले की, विजय शिवतारे यांनी योग्य भाषेचा वापर करावा. त्यांना जर निवडणूक लढण्याची एवढीच इच्छा असेल तर कल्याण लोकसभा मतदारसंघातही आमचे कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत. कल्याण लोकसभा कशी तुम्ही जिंकून येता, हे आम्हालाही पाहता येईल, असा थेट मुख्यमंत्र्यांनाच इशारा दिला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना थोडा संयम बाळगावा. अन्यथा आमच्या कार्यकर्त्यांच्या भावनाही भडकू शकतात, असा इशाराच परांजपे यांनी दिलाय.

हेही वाचा -

  1. Uddhav Thackeray : अबकी बार 'चंद्रहार'! पळपुटे, नामर्द पळून जातायत आणि मर्द पक्षात येतायत; उद्धव ठाकरेंची गर्जना
  2. State Cabinet Meeting : शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव बंधनकारक; मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणखी कुठले महत्त्वाचे निर्णय?
  3. महायुतीची जागा वाटपाची दिल्लीतील बैठक रद्द; एकनाथ शिंदे, अजित पवार गटाचं टेन्शन वाढलं
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.